Pune Crime News Saamtv
क्राईम

Pune Crime: १० वर्षाच्या प्रेमाचा क्रूर अंत! IT इंजिनिअर तरुणीची 'OYO'मध्ये हत्या; भयंकर घटनेचं लखनौ ते पुणे कनेक्शन

गोपाल मोटघरे

Hinjewadi Crime:

आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणी वंदना द्विवेदीची प्रियकराकडून पाच गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. रविवारी (२८, जानेवारी) या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी आरोपी ऋषभ निगम याला ताब्यात घेतले असून पोलीस तपासात या हत्येचे धक्कादायक कारण आता समोर आले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

वंदना द्वीवेदी व ऋषभ निगम हे दोघेही उत्तरप्रदेशमधील (Uttar Pradesh) लखनौ शहराचे रहिवासी. वंदना ही इन्फोसिस या नामांकित कंपनीमध्ये आयटी इंजिनिअर म्हणून नोकरीला होती. तर ऋषभ ब्रोकर होता. दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते मात्र ऋषभ वंदनाच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत होता. वंदना पुण्यात असल्याने त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. ती दुसऱ्याच्या प्रेमा पडली असावी असा त्याचा समज झाला होता. याच रागातून त्याने वंदनाची हत्या करण्याचे ठरवले.

25 जानेवारीला ऋषभ निगम हा लखनौवरून हिंजवडीतील महारुंजी भागात तिला भेटण्यासाठी आला. तिथे त्याने 'ओयो इंटरनॅशनल टाऊन हाऊस' या लॉजमध्ये एक रूम बुक केली होती. या लॉजमध्ये वंदना आणि ऋषभ हे दोन दिवस वास्तव्यास होते. 27 जानेवारीच्या रात्री वंदना व ऋषभमध्ये वाद झाला. यादरम्यान चारित्र्याच्या संशयावरून ऋषभ निगमने तिच्यावर त्याच्याजवळ असलेल्या बेकायदेशीर बंदुकीतून पाच गोळ्या झाडून तिची हत्या केली.

वंदनाची हत्या केल्यानंतर ऋषभ निगम हा घटनास्थळावरून मुंबईच्या दिशेने पसार झाला होता. मात्र पोलिसांनी सापळा लावून ऋषभ निगम याला अटक केली आहे. तसेच आरोपी विरोधात हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ऋषभ निगमने वंदना दिवेदी हिच्यावर बंदुकीतून पाच राऊंड गोळ्या झाडून तिची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघडकीस आल आहे. (Latest Marathi News)

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT