Sangli Crime
Sangli CrimeSaam tv

Sangli Crime: छेड काढणे पडले चांगलेच महागात; तरुणाला चोप देत तरुणीने नेले पोलिसात 

Sangli News : रस्त्यावरून जाणाऱ्या मुलींची रोडरोमिओंकडून छेड काढण्याचे प्रकार नेहमीच घडत असता. काही मुली घाबरून जातात. तर काहीजणी हिमतीने सामोरे जात तरुणांना उत्तर देत
Published on

सांगली : रस्त्यावरून जाणाऱ्या मुलीची छेड काढणे तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. छेड काढणाऱ्या तरुणाची धुलाई करत कॉलरला धरून तरुणी (Police) पोलीस स्टेशनला घेऊन गेली. हा प्रकार सांगली (Samgli) जिल्ह्यातील मिरजमध्ये घडला आहे. (maharashtra News)

Sangli Crime
Jalgaon News : तळोदा- बऱ्हाणपूर प्रस्तावित महामार्गामुळे जमीन जाणार; संतप्त शेतकऱ्यांकडून चक्काजाम

रस्त्यावरून जाणाऱ्या मुलींची रोडरोमिओंकडून छेड काढण्याचे प्रकार नेहमीच घडत असता. काही मुली घाबरून जातात. तर काहीजणी हिमतीने सामोरे जात तरुणांना उत्तर देत असतात. असाच प्रकार (Miraj) मिरज शहरात घडला आहे. सकाळी रस्त्याने जात असलेल्या तरुणीची एका तरुणाने छेड काढल्याचा प्रकार घडला. (Crime News) यानंतर तरुणीने भर रस्त्यावर मारहाण करत पोलिस स्टेशनपर्यंत (Miraj Police) धिंड काढल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले होते. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sangli Crime
Aasha Sevika Strike : आशा सेविकांचे काळ्या साड्या घालत चटणी भाकर आंदोलन; सरकार विरोधात घोषणाबाजी

कॉलर पकडून नेले पोलीस स्टेशनला 

सदर तरुण हा चायनीज गाड्यावरील कामगार असून भर रस्त्यावरून कॉलरला पकडून पोलिस स्टेशनपर्यंत तरुणाची धिंड काढत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. हा सर्व प्रकार रस्त्यावरील दुकानांच्यावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद‌ झाला आहे. मिरज शहर पोलीस ठाणे येथे सदर प्रकरणाची अद्याप तरी नोंद झाली नसल्याचे समजते. परंतु या घटनेने टवाळखोर तरुणाच्यावर या घटनेने जबर वचक बसणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com