MP Crime Saam Tv
क्राईम

MP Crime : नवऱ्यावरील आरोप मागे घे, म्हणणाऱ्या महिलेवर सामूहिक अत्याचार; बलात्कारानंतर आरोपींनी महिलेला जाळलं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Physical Abused pregnant woman:

मध्य प्रदेशातून एक संतापजनक घटना घडलीय. आरोपींनी गरोदर महिलेवर सामूहिक बलात्कार केला आणि नंतर तिच्यावर पेट्रोल टाकून तिला जाळल्याची घटना मध्य प्रदेशातील मुरैना येथे घडलीय. आगीत पीडिता ८० टक्के भाजलीय. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले हा कौटुंबिक वाद आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.(Latest News)

मुरैना जिल्ह्यातील अंबा शहराजवळील चांदपूर गावात ही घटना घडली. सामूहिक बलात्कार झालेल्या गर्भवती महिलेच्या पतीवर बलात्काराचा आरोप आहे. पीडित महिला पतीवर आरोप करणाऱ्या महिलेकडे तिला समजवण्यासाठी आणि तडजोड करण्यासाठी गेली होती. यावेळी महिलेसोबत कोणताही समझोता झाला नाही.

मात्र त्या महिलेसोबत घरात असलेल्या तिघांनी समजूत घालणाऱ्या महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर या नराधमाच्या तावडीतून तिने सुटून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपीने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले, त्यामुळे महिला गंभीररित्या भाजली. जळालेल्या महिलेला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला ग्वाल्हेर रुग्णालयात पाठवले आहे.

रुग्णालयात नेत असताना पीडितेने आपला जबाब नोंदवलाय. आधी आपल्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि नंतर दुसरी महिला आणि तीन लोकांनी जाळलं,असं या महिलेने आपल्या जबाबात म्हटलं आहे. याबाबत अंबा पोलीस ठाण्याचे निरीक्षक आलोक परिहार यांनी सांगितले की, पीडित महिला आपल्या पतीवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेशी तडजोड करण्यासाठी गावात गेली होती.

यादरम्यान वाद मिटवण्याऐवजी महिलेच्या घरात उपस्थित असलेल्या तिघांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पतीने पत्नीच्या जबाबाचा व्हिडिओ पोलिसांकडे सोपवला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारताच्या रणरागिणी पाकिस्तानवर पडल्या भारी! हरमनप्रीत शेवटपर्यंत लढली

Mumbai Accident: पश्चिम द्रुतगती महामार्गावर टेम्पोचा भीषण अपघात, गोरेगाव ते मालाड दरम्यान वाहतूक कोंडी

Marathi News Live Updates : जयंत पाटलांनी पैसे वाटल्याचे आरोप सिद्ध करावेत, दीपक केसरकरांचं खुलं आव्हान

VIDEO : स्मारकाच्या शोधत राजे; महाराजांच्या नावाने खेळ करू नका, संभाजीराजेंनी दिला इशारा

Jayant Patil : पटेलांच्या पुतळ्यापेक्षा कोणताही पुतळा उंच असू नये, हे ठरवलंय ; जयंत पाटलांचा भाजपवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT