Crime News Saam Tv
क्राईम

Crime News: पेणमधील लॉज व्यवस्थापकाच्या हत्येचं गुढ उकललं; कोल्हापुरात तरुणाची हत्या,पोलीस मारेकरींच्या शोधात

Crime News: कोल्हापूर, पेण, आणि कल्याण येथे वेगवेगळ्या गुन्ह्याच्या घटना घडल्या आहेत. कोल्हापुरात एका तरुणाची हत्या झाल्याची घटना घडलीय. ही घटना शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड गावात घडलीय.पोलीस सीसीटीव्हीद्वारे आरोपींचा शोध घेत आहेत. तर पेणमधील लॉज व्यवस्थापकाच्या हत्या का झाली याचं गुढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे.

Bharat Jadhav

Pen vadkhal Lodge manager killed In ilicit Affair:

लॉजच्या व्यवस्थापकाची हत्येचं गुढ उकलण्यात रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. पेण तालुक्यातील वडखळ येथील लॉजच्या व्यवस्थपकाचा खून करण्यात आला होता. अनैतिक संबधातून व्यवस्थपकाची हत्या झाली बब समोर आलीय. पोलिसांनी या हत्येप्रकरणात एक महिलेसह दोन जणांना अटक केलीय. हत्येतील आरोपी उत्तर प्रदेशात पळून जाण्याच्या बेतात होते. (Latest News)

चंद्रजीत भारद्वाज (वय वर्ष ३०), हरीशंकर राजभर वय वर्ष १९ आणि अजुदेवी चौहान (वय ३२ ) हे सर्व आरोपी उत्तर प्रदेशातील रहिवाशी आहेत. हे आरोपी व्यवस्थापकाची हत्या करून उत्तर प्रदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात होते त्यावेळी पोलिसांनी यांना अटक केलीय. लॉजचा मॅनेजर ४० वर्षांचा होता. आरोपींनी धारदार शस्त्राने त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचे गुप्तांग कापले. या हत्येची घटना उघड झाल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. आज रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी हत्येतील आरोपींना अटक केलीय. अनैतिक संबंधातून या लॉज व्यवस्थापकाची हत्या झाल्याचं पोलिसांनी सांगितले.

धारधार हत्यारांनी वार करत तरुणाचा खून

कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथे एका तरुणाची हत्या झाल्याची घटना घडलीय. मृत व्यक्तीचे नाव संतोष कदम असून त्याच्या शरिरावर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले आहेत. कुरुंदवाड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,तरुणाची हत्या केल्यानंतर मारेकरी चार चाकी वाहनाने पसार झाले. घटनास्थळी फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथक रवाना झाले आहेत. परिसरात असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेच्या आधारे पोलीस संशयित आरोपींचा शोध घेत आहेत.

भरधाव वाहनाची पोलीस वाहतूक पोलीस चौकीला धडक

कल्याण येथील दुर्गाडी चौकात असलेल्या पोलीस वाहतूक पोलीस चौकीला भरधाव वाहन धडकल्याची घटना घडलीय. चारचाकी वाहनाचा चालकाने दारुचे सेवन केले होते. भिवंडीहून कल्याणच्या दिशेने येणाऱ्या या मद्यधुंद चालकाच्या वाहनाने कोणगाव परिसरात ७ ते ८ जणांना धडक देत जखमी केले आहे.

कोनगाव पुलावरून दुर्गाडीच्या दिशेने येत असताना मद्यधुंद चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहनावरील ताबा सुटल्यानंतर वाहन थेट वाहतूक पोलीस चौकीला धडकले. दुर्गाडी चौकात कर्तव्यावर असलेल्या ट्राफिक वॉर्डनने सागर जोहरे या मध्यधुंद चालकाला ताब्यात घेत बाजारपेठ पोलिसांच्या केलं स्वाधीन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT