pelhar police arrests 4 near vasai  Saam Digital
क्राईम

Vasai Crime News : 49 किलो गांजासह चाैघांना अटक, पेल्हार पोलिसांची कारवाई

Vasai News : रिक्षातून आलेल्या दोघांकडे 5 लाख 28 हजार रुपये किंमतीचा 24 किलो गांजा मिळून आला आहे. पेल्हार पोलिसांनी गांजा जप्त करत दाेघांना अटक केली.

Siddharth Latkar

- महेंद्र वानखेडे

पेल्हार पोलिसांनी सोपारा फाटा आणि तुंगारफाटा येथून चार संशियत आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून 49 किलो गांजा जप्त केला. पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करून चाैघांना अटकही केली. दरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा कुठून व कोणासाठी आणला होता याचा तपास पोलिस करत आहेत.

सोपारा फाटा येथे दोघे जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पाेलिसांनी मिळाली. त्यानंतर पाेलिसांनी सापळा रचून बुधवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास मुक्तार सय्यद (वय 31) आणि एका ४९ वर्षीय महिलेला ताब्यात घेतले. त्या दोघांकडून 5 लाख 61 हजार रुपये किंमतीचा 25 किलो गांजा पाेलिसांनी हस्तगत केला. पेल्हार पोलिसांनी दाेघांना अटक केली.

दुसऱ्या घटनेत तुंगार फाटा येथे दोघे जण गांजा विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यावर पाेलिसांनी सापळा रचून बुधवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास मनोज यादव (वय 30) आणि मनोज साव (वय 30) या दोघांना ताब्यात घेतले. रिक्षातून आलेल्या दोघांकडे 5 लाख 28 हजार रुपये किंमतीचा 24 किलो गांजा मिळून आला आहे. पेल्हार पोलिसांनी गांजा जप्त करत दाेघांना अटक केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT