Parbhani Crime News Saam Tv
क्राईम

Shocking : एकाच तरुणीला दोघांनी ब्लॅकमेल करून केला बलात्कार, शिक्षकाच्या काळ्या कृत्यामुळे परभणी हादरली

Parbhani Crime News : परभणीत अल्पवयीन मुलीवर शिक्षकाने सहलीदरम्यान व्हिडिओ काढून अत्याचार केला. तर दुसऱ्या घटनेत तरुणांनी AI तंत्रज्ञानाचा गैरवापर करून शोषण केले. या धक्कादायक घटनेने परभणीत संताप व्यक्त केला जात आहे.

Alisha Khedekar

  • परभणीत अल्पवयीन मुलीवर शिक्षक आणि तरुणांकडून अत्याचार.

  • सहलीदरम्यान शिक्षकाने विद्यार्थिनीचा व्हिडिओ काढून धमकावले.

  • तरुणांनी AI तंत्रज्ञानाचा गैरवापर करून अश्लील फोटो तयार केले.

  • चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परभणीत एकाच मुलीसोबत दोन संतापजनक घटना घडल्या आहेत. शाळेतील शिक्षकाने सहलीदरम्यान विद्यार्थिनीचा कपडे बदलताना व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर सातत्याने अत्याचार केले. तर याच मुलीचे आणखी एका मुलाने AI ची मदत घेऊन अश्लील चित्रीकरण करत ते व्हायरल करण्याची धमकी दिली. आणि मित्रांसह या मुलाने पीडितेचे शोषण केले. या घटनेने परभणीत नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,संतोष मलसटवाड हा परभणीच्या सेलू शहरातील नागरिक आहे. तो नूतन विद्यालयात शिक्षक आहे. या शाळेची सहल रायगड आणि महाबळेश्वर येथे गेली होती. या दरम्यान संतोष याने एका विद्यार्थिनीचा कपडे बदलताना अश्लील व्हिडिओ काढला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले.

दरम्यान पीडित मुलगी ट्युशन ला गेलेली असताना एका अल्पवयीन मुलाने त्याच्या मित्रांसह तिथे येऊन तिचा फोटो काढला. हा फोटो AI तंत्रज्ञानाद्वारे अश्लील करून तो फोटो सर्वत्र पाठवून बदनामी करण्याची धमकी दिली. आणि मित्राच्या मदतीने या तरुणाने पीडितेवर अत्याचार केले. तरुणीने हे प्रकरण कुटुंबियांना सांगताच कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणात तरुणीने दिलेल्या फिर्यादी नुसार, आरोपी शिक्षक संतोष मसलटवाड,अल्पवयीन तरुण त्याचा मित्र नितीन परदेशी व इतर एक जण अशा ४ जणांवर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम ६४(२)(I)(M)(F)75,78,351(2)(3),3(5)BNS सह कलम 4,8,9 (L)(F)10,12,पोक्सो २०१२ या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्वांना अटक करण्यात आलेली आहे. दरम्यान या घटनेने परभणीत संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautami Patil: गेली गौतमी पाटील कुणीकडे? पोलिसांची नोटीस स्वीकारली, पण ४ दिवसांपासून संपर्क क्षेत्राच्या बाहेर!

लय भारी! FASTag नसलेल्या वाहनचालकांना मोठा दिलासा, नवा नियम होणार लागू

Maharashtra Live News Update : शक्ती वादळाच्या पार्श्वभुमीवर मच्छीमारांना खोलसमुद्रात न जाण्याच्या सुचना

Google Chrome वापरताय? सरकारने दिला मोठा इशारा; लगेच करा हे 1 काम अन् राहा सेफ

Shocking : संतापाचा कडेलोट! मित्र सोबत, बॉयफ्रेंडचा गर्लफ्रेंडवर अत्याचाराचा प्रयत्न, विरोध केल्यानं बाइकला बांधून फरफटत नेलं!

SCROLL FOR NEXT