Heavy police deployment in Hamdapur village, Parbhani, after a violent assault over an eve-teasing dispute. Saam tv
क्राईम

Parbhani Crime: धक्कादायक! छेडछाडीचा जाब विचारल्यानं डोकं फिरलं; २०० जणांनी मुलीसह अख्खा कुटुंबाला लाठ्या काठ्यांनी बेदम मारलं| Video

Parbhani Crime : परभणीमध्ये दहावीच्या विद्यार्थिनीची छेड काढल्याची घटना घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलाने मुलाला जाब विचारत त्याला चपराक मारली. त्यानंतर मुलाने २०० जणांना घेऊन मुलीच्या कुटुंबियांना मारहाण केली.

Bharat Jadhav

  • छेडछाडीचा जाब विचारल्याने कुटुंबावर हल्ला

  • दहावीतील मुलीसह 8 जण गंभीर जखमी

  • 16 आरोपींविरोधात ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा

दहावीत शिकणाऱ्या मुलीची छेड का काढली असा जाब विचारल्याचा राग येत मुलानं मुलीच्या कुटुंबियांना मारहाण केली आहे. मुलीच्या घरी जाऊन मुलाने तिच्यासह तिच्या कुटुंबियांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुलीसह ८ जण गंभीर जखमी झालेत. ही धक्कादायक घटना परभणीत घडली आहे. या प्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून तब्बल १६ जणांविरोधात ॲट्रॉसिटी ॲक्ट आणि इतर 21 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे हमदापूर गावात तणाव निर्माण झालाय. गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, मुलगी इयत्ता दहावीची विद्यार्थिनी आहे. तिची गावातील एकाने छेड काढली. त्यावेळी मुलीच्या घरच्यांनी त्या मुलाला जाब विचारत मुलीच्या बापाने त्याला चापट मारली. त्याचा राग मनात धरत मुलाने मुलीच्या घरी जात तिच्यासह कुटुंबियांना मारहाण केली. ही धक्कादायक घटना परभणीतील मानवत तालुक्यात असलेल्या हमदापूर गावात घडलीय. मुलीच्या बापाने चापट मारल्याचा राग आल्यानंतर आरोपी मुलगा २०० जणांना घेऊन मुलीच्या घरी गेला. त्यावेळी त्याने घरातील सर्व कुटुंबियांना मारलं. या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाला आहे.

मुलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलगा गाडीने आमच्या घराजवळ आला. त्याने गाडी रस्त्यावर लावली. त्यानंतर माझ्या मुलीचा हात ओढत तिला गाडीत जबरदस्तीनं बसवू लागला. त्यावेळी मुलीनं त्याचा हात झटकत घरी पळून आली. तिने त्याच्या वडिलांना सांगितलं. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी मुलाचं घर गाठलं आणि त्यांना मुलाचं कृत्य सांगितलं. तेव्हा मुलाच्या घरच्यांनी सांगितलं, तुम्हाला काय करायचं ते करा. त्या रात्री आम्ही काही तक्रार दाखल केली नव्हती. त्याच रात्री तो मुलगा २०० जणांना घेऊन आमच्या घरी आला. आमच्या घरातील ९ ते १० जणांना मारहाण केली. घरातील महिलांसह लहान मुलांना सुद्धा त्यांनी मारलं. लाठ्या काठ्यांनी त्यांनी आम्हाला मारलं.

बायकोला नवऱ्याचं लफडं कळलं नंतर घेतला टोकाचा निर्णय , नंदुरबारमधील धक्कादायक घटना

पतीच्या विवाहबाह्य संबंध आणि सततच्या शारीरिक-मानसिक छळाला कंटाळून एक विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना नंदुरबार जिल्ह्यातील रमकुबाई नगरात घटना घडली. भाग्यश्री गौरव चौधरी ( वर्षे २९ ) असे या मृत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार गौरव चौधरीने भाग्यश्रीला वेळोवेळी मारहाण केली.

त्याच्या विवाहबाह्य प्रेयसीबरोबरचे संबंध असल्याने भाग्यश्रीने पतीला समजावण्याचा अनेकदा प्रयत्न केला, पण त्याने पत्नीचं ऐकलं नाही. उलट तिला अधिक त्रास देऊ लागला. भाग्यश्रीच्या माहेरील आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने तिने हा अन्याय लपवला. मात्र नेहमीच्या कौटुंबिक हिंसाचाराला कंटाळून तिने जीवन संपवलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईच्या महापौर निवडीवरून ट्विस्ट; जुनी रोटेशन पद्धत बदलणार, कोणाला मिळणार संधी?

Tuesday Horoscope: पैशाची तंगी होणार दूर, ४ राशींची होणार भरभराट; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Gold-Silver Price: सोन्यानंतर चांदीही चमकली; जाणून घ्या दिवसाअखेरचा सोने-चांदीचा दर

ऐन निवडणुकीत अजित पवारांना मोठा धक्का; बड्या नेत्याने हाती धरलं शिवसेनेचे 'धनुष्यबाण'

Maharashtra Live News Update: मध्य रेल्वेद्वारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसचा सातवा वर्धापनदिन साजरा

SCROLL FOR NEXT