panchavati police charged six in youth hitting case saam tv
क्राईम

Nashik Crime News : पंचवटी परिसरात युवकाची हत्या, सहा जणांचा शाेध सुरु

Nashik Latest Marathi News : आमची कुरापत का काढतो या किरकोळ कारणावरुन युवकाची सहा जणांनी हत्या केल्याची प्राथमिक माहिती पंचवटी पाेलिसांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

Siddharth Latkar

- तबरेज शेख

Nashik News :

नाशिक शहरात आज (साेमवार) पहाटेच्या सुमारास एक युवकाची हत्या झाली. हा युवक एक सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समाेर आली आहे. या हत्या प्रकरणी पाेलिसांना सहा जणांवर संशय असून त्यांचा पंचवटी पाेलिस शाेध घेताहेत.  (Maharashtra News)

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार नाशिकच्या पंचवटी भागातील फुलेनालगर म्हाडा बिल्डिंग येथील सुलभ शौचालया परिसरात आज पहाटेेच्या सुमारास एका सराईत गुन्हेगाराची हत्या झाल्याची घटना घडली. निलेश श्रीपत उपाडे (वय २१) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.

निलेशवर रात्रीच्या सुमारास धारदार शस्त्राने वार करीत त्याची हत्या झाली असावी. आमची कुरापत का काढतो या किरकोळ कारणावरुन त्याची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पाेलिसांनी दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या प्रकरणी सहा संशयित निष्पन्न झाले आहेत. त्यापैकी चार अल्पवयीन आहेत तर दोन सज्ञान आहे. हे संशयित रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहेत. त्यांचा शाेध पंचवटी पोलिस करीत आहेत अशी माहिती (मधुकर कट, वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंचवटी पोलिस स्टेशनय) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : प्रेम विवाहाला विरोध, मेव्हण्याने भाऊजीचा काटा काढला; हॉटेलवर जेवायला नेलं नंतर..., सोलापुरात भयानक हत्याकांड

SBI CBO Reruitment: स्टेट बँकेत नोकरी; २,२७३ पदांसाठी भरती; पगार मिळणार ८५,९२०; अर्ज कसा करावा?

Maharashtra Budget 2026: अजित पवारांच्या निधनानंतर मुख्यमंत्री अर्थसंकल्प मांडणार, अर्थ - नियोजन खातं देवेंद्र फडणवीसांकडे?

Maharashtra Live News Update: नाशिक महापालिकेच्या महापौर पदाचा चेहरा ३ फेब्रुवारीला होणार स्पष्ट

Mardaani 3: राणी मुखर्जीचा मर्दानी ३ करणार ग्रँड ओपनिंग; अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये केली बंपर

SCROLL FOR NEXT