Nabarangpur district in shock after 14-year-old boy kills 5-year-old over revenge; police uncover chilling motive. Saam TV
क्राईम

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

Odisha Crime : ओडिशाच्या नबरंगपूर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. एका १४ वर्षांच्या मुलाने बदला घेण्यासाठी ५ वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या केली. पोलीस तपासात या हत्येमागील धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Bharat Jadhav

  • नबरंगपूर जिल्ह्यात १४ वर्षाच्या मुलानं ५ वर्षाच्या मुलाची हत्या.

  • पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतलं आहे.

  • स्थानिकांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झाले आहे.

ओडिशाच्या नबरंगपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना घडलीय. पापदहंडी पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या कृष्णगुडा गावात, एका १४ वर्षांच्या मुलाने ५ वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी १४ वर्षाच्या मुलाला ताब्यात घेतलंय. शुक्रवारी सकाळी ५ वर्षांचा मजेश माहुरिया नावाचा मुलगा खेळण्यासाठी घराबाहेर गेला होता.

पण बराच वेळ होऊही तो परतला नाही तेव्हा त्याच्या कुटुंबाने त्याचा शोध सुरू केला. इतर गावकरीही त्याचा शोध घेऊ लागले. त्यावेळी त्यांना एका जुन्या पडक्या घराचा दरवाजा बंद असल्याचं दिसलं. तेथून दुर्गंधी येत होती. त्यावेळी माहुरियाच्या कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी तेथील दृश्य पाहून त्यांच्या पाय खालची जमीन सरकरली. तर माहुरिया कुटुंबियांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते.

त्यांना अख्ख जग एकाच क्षणात थांबल्या सारखं वाटू लागलं. त्यांना बंद घरात मजेश माहुरियाचा मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे आरोपी मुलगाही घरात उपस्थित होता. सुरुवातीला त्याने काहीही माहिती नसल्याचे सांगितलं, परंतु गावकऱ्यांनी त्याला विचारपूस केली तेव्हा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. संतापलेल्या गावकऱ्यांनी त्याला पकडले आणि मारहाण केली. माहिती मिळताच पापडहांडी पोलीस घटनास्थळी पोहोचले.

त्यांनी आरोपीला जमावापासून वाचवले आणि त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि घटनास्थळी वैज्ञानिक तपास पथकाला बोलावलं. पोलिसांच्या सुरुवातीच्या तपासात ही हत्या सूड घेण्यासाठी करण्यात आली होती असे दिसून आले. काही दिवसांपूर्वी गावात वाद झाला होता.

मजेशचे वडील शिबा माहुरिया यांचे ४,००० रुपये गायब झाले होते. पैशांच्या चोरीचा संशय आल्याने, गावकऱ्यांनी आरोपी मुलाला चौकशीसाठी बोलावले. गावातील सभेत त्याला जाहीरपणे रागवण्यात आले, त्यामुळे त्याच्या कुटुंबाला खूप अपमानित वाटू लागलं. या घटनेमुळे संतप्त झालेल्या आरोपी मुलाने बदला घेण्याचे ठरवले आणि तो संधीच्या शोधत होता. शुक्रवारी संधी मिळाल्यावर त्याने निष्पाप मजेशची हत्या केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: रिलस्टार ते डेप्युटी कलेक्टर! दुसऱ्या प्रयत्नात केली MPPSC क्रॅक; हर्षिता दवे यांचा प्रवास

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT