Yerwada Firing  Saam Tv
क्राईम

Pune Crime News: पुण्यात पुन्हा 'मुळशी पॅटर्न'; भरचौकात तरुणावर गोळीबार, उपचारादरम्यान मृत्यू

Pune Mulsi Pattern : येरवड्यात घडलेल्या गोळीबाराची घटनेची राज्यभरात चर्चा होतेय. पुण्यात नव्याने गुन्ह्याचा मुळशी पॅटर्न केला जात असून या पॅटर्नचा राज्यात चर्चा होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अक्षय बडवे, पुणे

Crime Mulshi Pattern In Pune : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढू लागलीय. शहरातील मुळशी पॅटर्नची राज्यभरात चर्चा सुरू झालीय. दोन दिवसांपूर्वी येरवडा भागात झालेल्या गोळीबारात तरुण जखमी झाला होता. या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. विकी राजू चंडालीया (वय ३१) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मुळशी पॅटर्ननुसार गोळीबार केल्यानंतर तरुणावर वार केल्याची घटना पुण्यातील २ दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणाची राहुल चंडालीया याने पोलिसात तक्रार दिलीय. तक्रारीनुसार येरवडा पोलिसांनी आकाश चंडालीया, अक्षय सतीश चंडालीया, अमन सतीश चंडालीया, अभिषेक शाम चंडालीया, संदेश संतोष चंडालीया, सुशांत प्रकाश कांबळे आणि संकेत तारू यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलाय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,"येरवडा येथील अग्रसेन शाळेसमोर विकी चंडालीया याचे व्हीआर ४ यु' नावाचे हॉटेल आहे. खुनाच्या गुन्ह्यात सहा महिन्यांपूर्वी येरवडा कारागृहातून आकाश चंडालीया जामिनावर बाहेर आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे एकच्या सुमारास आकाश चंडालीया हा त्याच्या भाऊ व साथीदारांसोबत विकीच्या हॉटेलमध्ये शिरले. आकाशने विकीकडे पुन्हा पैसे मागितले. विकी ने पैसे देण्यास नकार दिला.

त्यामुळे आकाशने त्याच्या जवळील पिस्तूल काढून हवेत एक व दुसरी गोळी विकीवर झाडली. विकीच्या पोटाच्या उजव्या बाजूला कमरेला गोळी लागली. त्याच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज त्याचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT