Uttar Pradesh Crime Saam Tv
क्राईम

Crime: नीटच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, आधी अपहरण; गुंगीचे इंजेक्शन देत अत्याचार, सिगारेटचे चटकेही दिले

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशमध्ये नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे.

Priya More

उत्तर प्रदेशमध्ये नीटच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोचिंग क्लासेसवरून घरी परत येत असताना काही तरुणांनी या मुलीचे कारमधून अपहरण केले. त्यानंतर १६ दिवस छळ करत या विद्यार्थिनीवर आरोपींनी आळीपाळीने बलात्कार केला. आरोपींनी पीडितेला गुंगीचे इंजेक्शन देत हे भयंकर कृत्य केले. ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. आरोपींनी तिच्या शरीरावर सिगारेटने चटके दिले. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना उत्तर प्रदेशातील महोबा येथे घडली. पीडित मुलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनी मध्य प्रदेशातील आहे. उत्तर प्रदेशच्या महोबा शहरात ती राहत होती आणि नीट परीक्षेची तयारी करत होती. ३० एप्रिल रोजी कोचिंग क्लासवरून घरी परत येत असताना काही तरुणांनी कारमधून तिचे जबरदस्तीने अपहरण केले. १६ दिवस आरोपींनी पीडितेवर अत्याचार केले. पोलिसांनी तिची आरोपींच्या तावडीतून सुटका केली तेव्हा तिने आपल्यावर झालेल्या भयानक अत्याचाराची कहाणी सर्वांना सांगितली. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. पुरावे आणि पीडितेच्या जबानीच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.Crime

पीडित विद्यार्थिनीने पोलिसांना सांगितले की, तिच्याच गावातील रहिवासी मोहित श्रीवासने त्याचा मित्र अंकित श्रीवास आणि हल्लू राजपूत यांच्यासह ६ जणांनी तिचे अपहरण केले. तिला प्रयागराजमध्ये १६ दिवस ओलीस ठेवले होते. तिला दर दोन तासांनी गुंगीच्या औषधांची इंजेक्शने दिली जात होती आणि तिच्यावर आळीपाळीने आरोपी बलात्कार करत होते. जेव्हा तिने विरोध केला तेव्हा आरोपींनी तिला सिगारेटने चटके दिले आणि चाकूने वार ही केले.

आरोपींपैकी एक जण तिच्या भावाचा फोटो दाखवून जीवे मारण्याची धमकी देत होता. आरोपी मोहित तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकला. पीडिता आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे न्यायाची आणि दोषींना फाशीच्या शिक्षेची मागणी करत आहे. या भयंकर घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Fort : किल्ला, समुद्र अन् हजारो फ्लेमिंगो; मुंबईतील 'या' ठिकाणाचं सौंदर्य मन मोहून टाकतं!

Diabetes Diet: डायबिटीजच्या रुग्णांसाठी 'ही' भाजी ठरू शकते फायदेशीर; ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी नक्की खा

Maharashtra News Live Update: धुळे सोलापूर महामार्गवर पुन्हा मराठा आंदोलकांनी रस्ता अडवला

सत्ताधारी पक्षातील नेत्याची भररस्त्यात हत्या; कार्यालयात जाताना सहा जणांच्या टोळीने घेरलं अन्...

विंचू आणि साप चावण्यात नेमका काय फरक? पावसाळ्यात या घटना का वाढतात, जाणून घ्या महत्त्वाची माहिती!

SCROLL FOR NEXT