Crime News  Saam Tv
क्राईम

Crime News: नवी मुंबईतील हॉटेलमध्ये राडा; हॉटेल चालकाकडून खंडणीची मागणी

Bharat Jadhav

(सिद्धेश म्हात्रे )

Navi Mumbai Crime:

शरद पवार गटाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस नवी मुंबई जिल्हाध्यक्षाची भावाने गुंडगिरी केल्याची घटना घडलीय. नवी मुंबईतील पाम बीच गॅलरीया मॉलमधील सेवेन्थ स्काय हॉटेल चालकाकडे खंडणी मागितली असल्याचं सांगितलं जातंय. नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अन्नू आंग्रे याचा भाऊ राहुल आंग्रे याने पिस्तूल दाखवत खंडणी मागितल्याचं सांगितलं जात आहे. (Latest News)

याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार, सेवेन्थ स्काय हॉटेलमध्ये पिस्तूल दाखवत धमकी आणि दमदाटी करत मागितली आहे. राहुल आंग्रेच्या गुंडगिरीचा प्रकार हॉटेलमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना पिस्तूल दाखवून त्यांना धमकत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. राहुलसोबत असलेल्या त्याच्या साथीदारांनी हॉटेलमधील वस्तूंची तोडफोड करत उन्माद घातला. दरम्यान याप्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, सेवेन्थ स्काय हॉटेलचा परवाना रद्द करण्यात यावा याची मागणी वारंवार केली गेली आहे.

याप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी तीनवेळा उत्पादन शुल्क विभाग आणि नवी मुंबई महानगरपालिकेला पत्रव्यवहार केलाय. मात्र या हॉटेलवर अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाहीये. रात्रभर चालत असणाऱ्या या पबमुळे गुन्ह्याच्या घटना घडत असतात. परंतु प्रशासनाकडून या हॉटेलवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाहीये.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख, जाणून घ्या;सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीचं जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT