Crime News Saamtv
क्राईम

Navi Mumbai Crime: कसली ही क्रुरता! आधी बेदम मारहाण, नंतर थेट अंगावर कुत्रा... पार्किंगच्या वादातून भयंकर कृत्य

Crime News: नवी मुंबईतील (Navi Mumbai) नेरूळ परिसरात पार्किंगच्या वादातून तुफान राडा झाल्याचे समोर आले आहे.

Gangappa Pujari

सिद्धेश म्हात्रे, प्रतिनिधी

Navi Mumbai Crime News:

मोठ्या शहरांमध्ये कार पार्किंग सध्या वादाचा मुद्दा ठरत असल्याचे दिसत आहे. वाढती वाहने आणि अपुऱ्या जागांमुळे कार पार्क कुठे करायची? असा प्रश्न अनेकदा पडतो. यावरुन भांडणे, वाद झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. नवी मुंबईमधून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नवी मुंबईतील (Navi Mumbai) नेरूळ परिसरात पार्किंगच्या वादातून तुफान राडा झाल्याचे समोर आले आहे. नेरुळ परिसरात एकाच सेक्टरमध्ये मात्र वेगळ्या इमारतीमध्ये राहणारे दोन व्यक्ती विठ्ठल राक्षे आणि मंगेश साळगावकर यांच्यात हा वाद झाला.

विठ्ठल राक्षे काही कामानिमित्त मंगेश मुळगावकर यांच्या इमारती समोर गेले असता त्यांनी आपली गाडी मंगेश मुळगावकर यांच्या इमारतीच्या गेट समोर उभी केली. यावेळी मुळगावकर यांनी राक्षे यांना विचारणा केली असता दोघात वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले यावेळी मुळगावकर यांनी राक्षे यांना जबर मारहाण केली.

यादरम्यान मुळगावकर यांनी चक्क आपला पाळीव कुत्रा राक्षे यांच्या अंगावर सोडला. यावेळी कुत्र्याने राक्षे यांच्या हाताला चावा घेऊन त्यांना जखमी केले. याप्रकरणी मंगेश मुळगावकर आणि त्यांचा मुलगा सौमिल मुळगावकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Job: इंडियन बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; या पदासाठी भरती सुरु, पगार किती? जाणून घ्या

VIDEO : खासदार प्रणिती शिंदे आणि आमदार कल्याणशेट्टी यांच्यात वाकयुद्ध | Marathi News

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

moravala Recipe: ‪आता घरच्या घरीच बनवा मोरावळा

Sambhajinagar News : उच्च न्यायालयाची निवडणूक आयोगास नोटीस; १५ लाख स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मतदानाचा प्रश्न

SCROLL FOR NEXT