गिरीश निकम, तबरेज शेखसह साम प्रतिनिधी
नाशिक: लोकसभा निवडणुकीची धामधूम शांत होत नाही तोच नाशिक पुन्हा चर्चेत आलं आहे. कारण आहे आयकर विभागाची मोठी कारवाई...कर बुडवणा-या सुराणा ज्वेलर्स या सराफा व्यावसायीकाकडे कोट्यवधींची बेहीशोबी मालमत्ता सापडली आहे. आयकर विभागाने तब्बल 26 कोटी रुपयांची रोकड आणि 90 कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त केले आहेत. ही कारवाई करताना नाशिक, नागपूर आणि जळगावचे अधिकारी एकत्र आले होते. ज्यावेळी आयकर विभागाच्या पथकाने छापेमारी केली त्यावेळी एका खोलीत पाचशे रुपयांच्या चलनी नोटांचा खच सापडला.
काही दिवसांपूर्वी नांदेडमध्ये अशाच प्रकारे केलेल्या कारवाईत 170 कोटींची बेहिशोबी मालमत्ता जप्त केली होती. तर धाडीत 14 कोटींची रोकड ताब्यात घेतली. त्यानंतर नाशिकमध्ये मोठी कारवाई झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईत काय-काय मिळालं ते पाहूया.
36 कोटींची रोकड, 90 कोटींचे कागदपत्र जप्त
50 आयकर अधिकाऱ्यांकडून छापेमारी
फर्निचरच्या आत लपवलेली रोकड जप्त
सलग 30 तास आयकरची कारवाई
रोकड मोजण्यासाठी लागले 14 तास
सुराणा ज्वेलर्स यांची पेढी तसेच त्यांच्या रिअल इस्टेटच्या कार्यालयातही छापासत्र सुरू होते. त्याचवेळी त्यांच्या शहरातील राका कॉलनी येथील बंगल्यात देखील पथकाने तपासणी केली. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेले त्यांचे कार्यालय, खासगी लॉकर्स आणि बँकांमधील लॉकर्सही तपासण्यात आले. मनमाड, नांदगाव येथील त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरीही तपासणी करण्यात आली. या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. आगामी काळात आयकर विभाग कारवाईचा बडगा कोणावर उचलणार याची भिती व्यावसायिकांमध्ये आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.