Jalgaon ED Raid: मोठी बातमी! मनीष जैन आणि ईश्वर जैन यांच्या 'राजमल लखीचंद ज्वेलर्स'वर ईडीची कारवाई, जळगाव शहरात खळबळ

ED Raid News: स्टेट बँकेकडून घेतलेल्या आणि थकीत कर्जाच्या संदर्बात ईडीच्या पथकाने कारवाई करत चौकशी सुरु केल्याचे सांगण्यात येत आहे.
Jalgaon ED Raid News
Jalgaon ED Raid NewsSaamtv

Jalgaon ED Raid News: सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगाव शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जळगावचे माजी आमदार मनीष जैन) आणि माजी खासदार ईश्वर जैन यांची मालकीच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवर (Rajmal Lakhichand Jewelers) ईडीच्या (ED) पथकाने चौकशी सुरु केली आहे. ईडीच्या या कारवाईने जळगाव शहरात खळबळ उडाली आहे.

Jalgaon ED Raid News
Nandurbar Leopard Attack: हृदयद्रावक! शेतात फिरायला गेलेल्या आजोबा- नातवावर बिबट्याचा हल्ला; १० वर्षीय बालकाचा मृत्यू

याबाबत अधिक माहिती अशी की, ईडीच्या (ED) पथकाने जळगावमधील (Jalgaon) प्रसिद्ध राजमल लखीचंद ज्वेलर्सचे (Rajmal Lakhichand Jewelers) चौकशी सुरु केली आहे. गुरुवारी (17 ऑगस्ट) सकाळी सात वाजल्याासून मुंबई, नागपूर, औरंगाबादसह विविध जिल्ह्यातून ईडी पथकाच्या 10 गाड्या एकाच वेळी जळगाव जिल्ह्यात दाखल झाल्या. या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे.

स्टेट बँकेकडून (SBI) घेतलेल्या आणि थकीत कर्जाच्या संदर्बात ईडीच्या पथकाने कारवाई करत चौकशी सुरु केल्याचे सांगण्यात येत आहे. मनीष जैन (Manish Jain) आणि माजी खासदार ईश्वर जैन (Ishwar Jain) यांच्या मालकीच्या जळगावसह नाशिकमधील एकूण सहा फर्मवर त्यांनी एकाच वेळी छापेमारी केली आहे.

Jalgaon ED Raid News
Pune Crime News: बाप नाही तू तर हैवान! बलात्कारप्रकरणी ५ वर्षांची शिक्षा भोगली; घरी परतल्यावर पुन्हा पोटच्या मुलीवर अत्याचार

ईडीकडून सर्व ठिकाणाच्या फार्मवर असलेल्या मालमत्ता आणि कागदपत्रांची तपासणी सुरु आहे. दरम्यान, या कारवाईमध्ये ईडीचे एकूण 60 कर्मचारी आणि अधिकारी सहभागी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जळगावच्या सुवर्ण नगरीत पहिल्यांदाचं ईडीचे पथक दाखल झाल्याने या कारवाईची सध्या शहरात चांगलीच चर्चा होत आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com