Nandurbar Leopard Attack: हृदयद्रावक! शेतात फिरायला गेलेल्या आजोबा- नातवावर बिबट्याचा हल्ला; १० वर्षीय बालकाचा मृत्यू

Nandurbar Leapord News: तळोदा तालुक्यातील दलेलपुर येथे घडलेल्या या दुर्देवी घटनेने परिसरात परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Leopard Attack
Leopard AttackSaam tv
Published On

सागर निकवाडे, प्रतिनिधी...

Nandurbar News: आजोबांसोबत शेतात गेलेल्या दहा वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला करत ठार केल्याची घटना नंदुरबार जिल्ह्यात घडली आहे. तळोदा तालुक्यातील दलेलपुर येथे घडलेल्या या दुर्देवी घटनेने परिसरात परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वन विभागाने यापूर्वीच बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न केले असते तर निरपराध बालकाला आपले प्राण गमवावे लागले नसते, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.

Leopard Attack
Talathi Bharati Exam 2023: तलाठी भरती परीक्षेला पहिल्याच दिवशी गालबोट! नाशिकमध्ये वॉकी टॉकीच्या मदतीने फोडला पेपर

याबाबत अधिक माहिती अशी की, दलेलपूर शिवारात गुलाब धानका व दामू धानका यांचे शेत आहे. शेतमजूर खेत्या वसावे हे नातू गुरुदेव वसावे (वय १०) याला सोबत घेऊन बुधवारी (ता. १६) श्री. धानका यांच्या शेतात कामासाठी गेले. यावेळी दबा धरुण बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. आजाबोंनी लागलीच आरडा ओरड करत काठीने बिबट्याला पळविण्याचा प्रयत्न केला.

मात्र बिबट्याने तोपर्यंत गुरुच्या मानेवर हल्ले केल्याने त्याला गंभीर जखमा झाल्या होत्या. घटनेनंतर त्याला तात्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी मृत घोषीत करण्यात आले. दरम्यान घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे.

Leopard Attack
Pune Crime News: बाप नाही तू तर हैवान! बलात्कारप्रकरणी ५ वर्षांची शिक्षा भोगली; घरी परतल्यावर पुन्हा पोटच्या मुलीवर अत्याचार

नागरिकांमध्ये भितीचे वातावरण..

दरम्यान, या घटनेने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात मागील काही घटनांवरून बिबट्यांची संख्या तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे दिसून येते. बिबट्यांची नेमकी संख्या कळण्यासाठी वन विभागाने विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com