Manasvi Choudhary
श्रावण महिन्याला सुरूवात झाली आहे. श्रावणात विविध पदार्थ बनवले जातात.
श्रावणात उपवासाला तुम्ही खास साबुदाणा लाडू बनवू शकता.
साबुदाणा लाडू बनवण्यासाठी शेंगदाणे, पिठीसाखर, साजूक तूप, वेलची पावडर, काजू- बदाम हे साहित्य तयार ठेवा.
लाडू बनवताना प्रथम गॅसवर कढईत साबुदाणा कुरकुरीत भाजून घ्या.
नंतर साबुदाणे थंड करा आणि मिक्सरमध्ये साधारण जाडसर वाटून घ्या.
कढईत शेंगदाणे भाजून त्याची साल काढून ते पण वाटून घ्या.
एका परातमध्ये साबुदाण्याची पूड, शेंगदाण्याची पूड, पिठीसाखर आणि वेलची एक संपूर्ण मिश्रण एकत्र करा.
गॅसवर एका भांड्यात साजूक तूपामध्ये काजू- बदाम भाजून हे मिश्रण योग्यरित्या एकजीव करा.
नंतर हे मिश्रण थंड करा आणि गोल आकारात लाडू वळून घ्या.
अशाप्रकारे उपवास स्पेशल साबुदाणा लाडू सर्व्हसाठी तयार होतील.