Shrirang Barne Wealth : दागिने, स्थावर मालमत्ता, वाहने आणि बरंच काही; १० वी उत्तीर्ण श्रीरंग बारणेंची एकूण संपत्ती किती?

Shrirang Barne Wealth information : मावळमधील श्रीरंग बारणे यांनीही सोमवारी उमेदावारीचा अर्ज भरला आहे. त्यानंतर शिंदे गटाचे मावळमधील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या कुटुंबीयांची संपत्तीविषयी माहिती समोर आली आहे.
Shrirang Barne Wealth
Shrirang Barne Wealth Saam tv

मावळ : देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. देशभरातील लोकप्रतिनिधी मतदानाच्या टप्प्यानुसार, उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. राजकीय नेते मंडळींना उमेदवारीचा अर्ज दाखल करताना संपत्ती जाहीर करावी लागते. अशात महायुतीचे मावळमधील श्रीरंग बारणे यांनीही सोमवारी उमेदावारीचा अर्ज भरला आहे. त्यानंतर शिंदे गटाचे मावळमधील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या कुटुंबीयांची संपत्तीविषयीची माहिती समोर आली आहे.

मागील ५ वर्षांत संपत्तीमध्ये ५ वर्षांनी वाढ

श्रीरंग बारणे यांच्या कुटुंबीयांची एकत्रित संपत्ती २५० कोटी रुपये असल्याची माहिती हाती आली आहे. मागील पाच वर्षात बारणे यांच्या संपत्तीत एकूण ३० कोटींची वाढ झाली आहे. बारणे यांच्याकडे सोन्याचे आणि हिऱ्यांचे 50 लाखांहून अधिकचे दागिने आहेत. तसेच त्यांच्याकडे 182 कोटींची स्थावर मालमत्ता आहे. तर 15 कोटींची जंगम मालमत्ता आहे. दीड कोटींची आलिशान वाहने देखील आहेत. तर बारणे यांच्यावर 85 लाखांचे कर्ज आहे.

Shrirang Barne Wealth
Praniti Shinde Wealth : प्रणिती शिंदेंच्या नावे साडेसहा कोटींची मालमत्ता; ५ वर्षांत मालमत्तेत १.८१ कोटींची वाढ

शेती, बांधकाम व्यवसाय खासदारकीचे मानधन, वारसा हक्काने मिळालेली मालमत्ता आणि ब्रिक्स फॅक्टरीच्या माध्यमातून ही संपत्ती मिळविल्याची बारणे यांचा दावा आहे.

Shrirang Barne Wealth
National Parties Wealth: कोरोना काळात राष्ट्रीय पक्षांना अच्छे दिन, भाजपच्या संपत्तीत वेगाने वाढ; काँग्रेसची मालमत्ता किती?

बारणेंचे शिक्षण दहावी पास

श्रीरंग बारणे हे २०१९ साली दहावी नापास होते. त्यानंतर मार्च २०२२ ला दहावीत उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्यावर दोन गुन्हे कोर्टात प्रलंबित आहेत. २००९ मध्ये आमदारकी आणि २०१९ मध्ये खासदारकीच्या निवडणुकीत चुकीची माहिती दिल्याबद्दल २०२१ मध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला. सध्या कोर्टात तपास सुरु आहे. तर बंद बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्यासाठी केलेल्या आंदोलनप्रकरणी दुसरा गुन्हा नोंद झाला. दुसरा गुन्हा हा खेड न्यायालयात प्रलंबित आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com