Nashik Police arrest accused in sextortion case after swift 5-hour operation in Satpur area Saam TV
क्राईम

टॅब चोरी केला; 200 अश्लील व्हिडिओ; 1200000 रुपयांची खंडणी, नाशिकमध्ये सेक्सस्कॅण्डल उघडकीस

Tablet Theft Leads to ₹12 Lakh Extortion Racket Busted: नाशिकमधील सातपूर परिसरात टॅब चोरी करून अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 12 लाखांची खंडणी उकळणाऱ्या टोळीचा पोलिसांनी अवघ्या 5 तासांत पर्दाफाश केला.

Omkar Sonawane

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

नाशिक: येथील सातपूर परिसरात अश्लील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत 12 लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या टोळीचा सातपूर पोलिसांनी अवघ्या पाच तासांत पर्दाफाश करत चार पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहे. ज्येष्ठ नागरिक असलेल्या फिर्यादीच्या तक्रारीनुसार संशयित आरोपींनी फिर्यादीचा एक टॅब चोरी करून त्यामधील मैत्रीणीसोबतचे वैयक्तिक आणि संवेदनशील अश्लील व्हिडिओ आणि फोटो मिळवले.

त्यानंतर हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत 12 लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यातील दहा हजार रुपये नुकतेच देण्यात आले होते. तर गुरुवारी (दि.2) सायंकाळी 50 हजार रुपये देण्याचे ठरले होते. मात्र संशयित टोळी पैसे स्वीकारतानच पोलिसांच्या हाती लागली.

आरोपींना दबाव टाकण्यासाठी फिर्यादीकडून 10 हजार रुपये उकळले आणि त्यांचे काही व्हिडिओ आणि फोरो व्हॉटसअ‍ॅपवर पाठवून धमकी अधिक तीव्र केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण अहिरे यांनी तात्काळ पोलीस आयुक्त आणि पोलीस उपआयुक्त आणि सहाय्यक आयुक्तांना माहिती दिली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखा युनिट 2 अशी दोन स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली.

तपासदरम्यान आरोपी आडगाव शिवारातील दहावा मैल परिसरात लपल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने सापळा रचला. पोलिसांना बघताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सर्व बाजूनी घेराव घालत सिनेस्टाईल पाठलाग त्यांच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणात आणखी कोणी आहे का याचा सखोल तपास पोलीस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HSC SSC Result 2026: महाराष्ट्र बोर्डाचे महत्त्वाचे पाऊल! दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदाच घेतला 'हा' निर्णय

Sanjay Dutt: संजय दत्तने मागितली महिला आयोगासमोर लेखी माफी; 'सरके चुनर' वादानंतर ५० मुलींच्या शिक्षणाचा उचलणार खर्च

Maharashtra News Live Update: खोपोली पेण रस्त्यावर हायवा डंपरला लागली आग

Summer diet tips: उन्हाळ्यात हे पदार्थ खाणं टाळाच, नाहीतर...!

Riteish Deshmukh - Raja Shivaji : सैराटमधील प्रसिद्ध अभिनेत्याने रितेश भाऊंसोबत फोटो केला शेअर, 'राजा शिवाजी' मध्ये 'या' महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार

SCROLL FOR NEXT