Crime  Saam tv
क्राईम

Nashik Crime : नाशिकमध्ये अनैतिक संबंधातून पोलीस पुत्राची निर्घृण हत्या, शिक्षिकाच निघाली वैरी

Nashik Crime : प्रियकराच्या हत्येसाठी आपल्या विद्यार्थ्यांनाच दोन लाखाची सुपारी दिली होती. पंचवटी पोलिसांनी अवघ्या पाच तासात हत्येचा तपास लावला.

Namdeo Kumbhar

तरबेज शेख, साम प्रतिनिधी

Nashik Crime News : शिक्षिकेपेशाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. विद्यार्थ्यांना चांगले वागणुकीचे धडे देणारीच शिक्षिका हत्यारी निघाली. प्रियकराच्या हत्येसाठी आपल्या विद्यार्थ्यांनाच दोन लाखाची सुपारी दिली होती. पंचवटी पोलिसांनी अवघ्या पाच तासात हत्येचा तपास लावला.

आज सकाळी नाशिक शहरातील पंचवटी परिसरात एका 25 वर्षी तरुणाची डोक्यात धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. यासंदर्भात नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासा दरम्यान निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे. हत्या झालेल्या तरुणाच नाव गगन कोकाटे असून तो राहणार मसरूळ परिसरातील होता. त्याच्या शेजारीच राहणाऱ्या आरोपी भावना कदम या शिक्षकेशी ओळख झाली आणि दोघांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.

मात्र या प्रेमप्रकरणात गगन हा वारंवार भावना यांना भेटण्यासाठी त्रास देत असायचा त्याचा राग मनात धरून चक्क शिक्षिका पेशा असलेल्या भावना कदम यांनी गगनचा काटा काढण्यासाठी आपल्याच विद्यार्थ्यांच्या मित्रांना दोन लाख रुपयांची सुपारी दिली. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी अवघ्या पाच तासात मारेकरी ताब्यात घेतले आहे यात दोन विधीसंघर्षित बालकांसह पाच जणांना अटक केली आहे. यात संकेत दिवे (२०) मेहफूज सय्यद (१८) रितेश सपकाळे (२०) गौतम दुसाने (१८) आणि मुख्य आरोपी भावना कदम यांना ताब्यात घेतले आहे. मात्र या घटनेमुळे नाशिक शहरातील शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींची आणखी २ ठिकाणी पार्टी, तपासातून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

पावसात लहानग्यांचे आरोग्य जपण्यासाठी घ्या 'ही' खबरदारी

Shirur News : शेतकरी दाम्पत्याची दोन एकर शेती सातबारावरून गायब; तलाठी व मंडळ अधिकाऱ्याचा प्रताप

Pune : ट्युशनमध्ये मुलाला बेल्ट अन् वह्यांनी बेदम मारहाण, ३५ वर्षाच्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT