Nashik Panchavati Crime News  Saam Tv
क्राईम

Nashik Crime News : २० वर्षीय विवाहितेवर सामूहिक अत्याचार, नवऱ्याला जामीन देऊ म्हणत नेलं शेतावर अन्..

Nashik Panchavati Crime News : अत्याचार करणाऱ्या आरोपींपैकी एकजण पीडित महिलेचा नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे. मारहाण आणि अत्याचार झाल्याची तक्रार पीडितेने केली आहे. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

Yash Shirke

अभिजीत सोनावणे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Nashik Crime News : नाशिकमधून धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरात एका वीस वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. पीडित महिलेवर अत्याचार करणारा आरोपी तिचा नातेवाईक असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा पती तुरुंगात शिक्षा भोगत आहे. आरोपींनी तिच्या पतीला जामीन देऊन सोडवण्याचे आमिष दाखवले. पीडितेला शेतावर नेले आणि तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. आरोपींनी मिळून तिला मारहाण देखील केली. त्यानंतर पीडितेने पोलीस ठाण्यात अत्याचार आणि मारहाण झाल्याची तक्रार केली.

अत्याचार करणारी व्यक्ती ही पीडित महिलेचा नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे. त्या आरोपीनेच पीडितेला आमिष दाखवत शेतामध्ये नेले होते. दरम्यान या प्रकाराची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्ह्याअंतर्गत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर फरार असलेल्या एका आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.

'मोकळ्या शेतात नेऊन मारहाण केली आणि अत्याचार केला अशी तक्रार पीडित महिलेने केली आहे. आरोपींपैकी एकजण तिचा नातेवाईक आहे. पीडितेचा नवरा नाशिक सेंट्रल तुरुंगात आहे. नवऱ्याला जामीन मिळवून देऊ असे आमिष दाखवून पीडितेला मुंबईतून बोलवून तिच्यावर आरोपींनी अत्याचार केला', अशी माहिती पंचवटी पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोकणातून तटकरेंच्या मुलाची बिनविरोध निवड; महायुतीत खदखद, शिंदेसेनेची फरफट

इंडिया आघाडीला मोठा धक्का; ३० खासदार असलेल्या पक्षाने फिरवली महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ

TMC Crisis: ममता बनर्जींना आणखी एक जबर धक्का; तब्बल २० खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

Rain Alert : १९ राज्यांना वादळी वाऱ्यांसह पाऊस झोडपून काढणार, ८० किमी वेगाने वाहणार वारे; हवामान खात्याचा इशारा

Podi Idli Recipe: सकाळी नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी पोडी इडली, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT