Nashik Crime News Saam Tv
क्राईम

Nashik Crime : उपसरपंचाकडून बायकोची हत्या, रात्री दारूच्या नशेत घरी आला, नंतर झोपलेल्या बायकोला जागीच संपवलं

Nashik Crime News : नाशिकच्या कळवण तालुक्यातील साकोरेपाडा येथे उपसरपंचाने दारूच्या नशेत पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आरोपीने नंतर आत्महत्येचा प्रयत्न केला असून पोलीस तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • नाशिकमध्ये उपसरपंचाकडून पत्नीची झोपेत हत्या

  • हत्या केल्यानंतर आरोपीने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

  • कळवण पोलीस अधिक तपास करत आहेत

अजय सोनावणे, नाशिक

नाशिकमधून खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. उपसरपंचाने पत्नीची हत्या केली असल्याचा संतापजनक प्रकार घडला. पत्नीच्या हत्येनंतर स्वतः देखील कीटकनाशक औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी उपसरपंचाला ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. सदर घटना नाशिकच्या कळवण तालूक्यातील साकोरेपाडा येथे आज पहाटेच्या सुमारास घडली. मृत महिलेचं नाव जिजाबाई जयराम पवार (वय ६०) असे आहे. तर साकोरेपाडा येथील उपसरपंच जयराम महारु पवार असे आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मृत जिजाबाई आणि उपसरपंच जयराम पवार यांच्यामध्ये दारूच्या व्यसनावरून कायम वाद व्हायचे. आज ३० जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास नेहमी प्रमाणे यांच्यात कडाक्याचे भांडण झाल्याने, दारूच्या नशेत असलेल्या जयराम पवार याने पत्नी जिजाबाई झोपेत असतांना तिच्यावर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केली..

पत्नीची हत्या केल्यानंतर जयरामने घरात असलेली पिकासाठी आणलेले किटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र किटकनाशक कमी विषारी असल्याने जयरामला थोडाफार त्रास जाणवल्याने त्याने उलट्या केल्या. त्यानंतर पहाटेच्या सुमारास ह्या झालेल्या कृत्याची माहिती स्वतः जयराम पवार याने पोलीस पाटील यांना दिली. पण पोलीस पाटील यांना जयराम हा दारूच्या नशेत होता असल्याने त्याच्यावर विश्वास बसत नव्हता. म्हणून त्यानंतर पोलीस पाटील यांनी गावातील सरपंच यांना बोलावून जयराम यांच्या घरी गेले.

यावेळेस जयरामच्या घरी जिजाबाई हि मृत अवस्थेत आढळली. त्यानंतर पोलीस पाटलांनी त्वरित कळवण पोलिसांना संपर्क करून माहिती दिली.पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास करण्यास सुरुवात केली. आरोपी जयराम पवार याने विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने, त्याला कळवण पोलिसांनी ताब्यात घेऊन उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्व घटनेचा अधिक तपास आता कळवण पोलिस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Korean Skin Care: ग्लोईंग आणि कोरियन ग्लास स्किन पाहिजे? मग रोज रात्री झोपताना 'ही' घरगुती पेस्ट नक्की लावा

Valentine Day 2026: प्रेमाच्या आठवड्याची सुरुवात कधी होणार? जाणून घ्या प्रत्येक दिवस का आहे खास?

Maharashtra Live News Update: पुणे महापालिकेसाठी भाजपकडून गटनेता पदावर शिक्कामोर्तब

Bridal Saree Designs: लग्नात रिस्पेशनसाठी 5 डिझाईनर साड्या, नवरीचा लूक दिसेल भारी

ठरलं! शिंदेसेनेकडे सव्वा वर्ष महापौरपद तर भाजपकडे उपमहापौरपद, ही महिला नेता संभाळणार महापालिकेची धुरा

SCROLL FOR NEXT