Nashik News Saam Tv
क्राईम

Heartbreaking : "आयुष्यात काही रसच नाही, गर्लफ्रेंडमुळे तीन वर्ष जगलो", १०वीच्या टॉपरची आत्महत्या, नेमकं प्रकरण काय?

Nashik News : नाशिकमध्ये १०वीच्या टॉपर विद्यार्थ्याने “आयुष्यात रसच नाही” म्हणत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नुकताच अभियांत्रिकी कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याने सोशल मीडियावर शेवटची भावनिक पोस्ट लिहून आपले आयुष्य संपवले.

Alisha Khedekar

  • नाशिकमध्ये १०वीच्या टॉपर विद्यार्थ्याची आत्महत्या

  • आत्महत्येपूर्वी विद्यार्थ्याने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केली होती.

  • अभियांत्रिकी कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर काही दिवसांतच विद्यार्थ्याने घेतलं टोकाचं पाऊल.

  • “आयुष्यात रस नाही, स्वप्नं शिल्लक नाहीत” असा मजकूर पोस्टमध्ये होता.

नवी मुंबई येथील एका १०वीच्या विद्यार्थिनीने शिक्षकांनी अपमान केल्यामुळे आत्महत्या केल्याचे काल उघडकीस आले. त्यानंतर नाशिक मधून अशीच एका मन हादरवणारी घटना घडली आहे. १०वीच्या टॉपरने आयुष्यात काही रसच नाही म्हणत आत्महत्या केली आहे. धक्कदायक म्हणजे या विद्यार्थ्याने नुकतंच इंजिनियरिंगसाठी प्रवेश घेतला होता. याचदरम्यान त्याने महाविद्यालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली असल्याचं समोर आलं आहे. या विद्यार्थ्यांचं नाव सोहम आहे. (बदलेलं नाव)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहम याने शनिवार दि. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजता गंगापूर रोड परिसरातील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेतली. त्याला शिक्षकांच्या मदतीने तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. गंगापूर पोलिसांनी या प्रकरणी मृत्यूची नोंद केली असून त्याने आत्महत्येपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट केल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोहम हा त्याच्या आई-वडिलांसह नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात राहत होता. त्याचे वडील एका खासगी कंपनी कार्यरत असून सोहम त्यांचा एकुलता एक मुलगा होता. काही दिवसांपूर्वीच त्याने अभियांत्रिकी महाविद्यालयात गुणवत्ता यादीनुसार प्रवेश घेतला होता. त्याला ९५ पेक्षा अधिक टक्के होते. शिवाय हुशार विद्यार्थ्यांच्या यादीत त्याचा प्रवेश झाल्याचे महाविद्यालयातील शिक्षकांनी सांगितले.

सोहमची शेवटची पोस्ट काय होती?

‘हाय, गाइज मी तुमच्याशी शेवटचा संवाद करत आहे. आयुष्यातील माझा इंटरेस्ट संपला आहे. माझ्या आयुष्यात ध्येय किंवा स्वप्नं शिल्लक राहिली नाहीत. माझ्यामुळे अनेकांना त्रास झाला आहे. तीन वर्षांपूर्वीच मी मरणार होतो. पण माझ्या गर्लफ्रेंडमुळे आणखी तीन वर्ष जगायला मिळाली. तुम्हा सर्वांना माहिती आहे, मी शाळेपासूनच त्रासात आणि निराशेत आहे. सो, मी आता तेच करणार आहे. जे माझ्या आयुष्यात होते, त्या सर्वांना थँक यु. माझे कुटुंब, मित्र आणि हितचिंतक सर्वांना ‘लव्ह यू’. सो, साइनिंग ऑफ फ्रॉम लाइफ, गूड बाय. सर्वांचे आणि पालकांचे प्रयत्न मी वाया घालवल्याबद्दल व्हेरी व्हेरी सॉरी. तुम्ही काही चुकीचं केलं नाही , मी त्यासाठी पात्र नव्हतो...’ या आशयाची पोस्ट त्याने लिहिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime News: फसवणूक प्रकरण: कल्याणमधील डॉक्टर बंटी बबलीला न्यायालयाचा दणका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Manoj Jarange Patil: आखण्यात आला होता जिवे मारण्याचा कट, तरीही मनोज जरांगेंनी नाकारलं पोलीस संरक्षण; काय आहे कारण?

Aadhaar Card Update: आधार कार्डमध्ये येईल QR कोड; काही सेकंदात होतील बँकेची कामे

Sangli Accident : अपघाताचा थरार, भरधाव ऊसाच्या ट्रॅक्टरची धडक; ST बस ओढापत्रात कोसळली

निवडणूक आयुक्त अमित शाहांचे पाया पडले? नेमके प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT