Bacchu Kadu : मैत्रीत दुरावा! गुलाबराव पाटलांची भेट न घेताच बच्चू कडू परतले, कारण काय?

Jalgaon News : जळगावमधील शेतकऱ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर बच्चू कडू आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यातील वाद पुन्हा चिघळला आहे. बच्चू कडू पाळधी गावाच्या वेशीवरूनच परतले असून त्यांनी गुलाबराव पाटलांची भेट घेतली नाही.
Bacchu Kadu : मैत्रीत दुरावा!  गुलाबराव पाटलांची भेट न घेताच बच्चू कडू परतले, कारण काय?
Maharashtra PoliticsSaam Tv
Published On
Summary
  • जळगावमध्ये शेतकऱ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर बच्चू कडू आणि गुलाबराव पाटील यांच्यात वाद निर्माण झाला.

  • गुलाबराव पाटील यांनी बच्चू कडूंसाठी खास खान्देशी पाहुणचार तयार ठेवला होता.

  • मात्र बच्चू कडू यांनी त्यांची भेट न घेता पाळधी गावाच्या वेशीवरूनच परतले.

  • या घटनेनंतर दोघांमधील नाराजी आणि राजकीय मतभेदांवर चर्चा सुरु आहे.

राज्यात मागील महिन्यात पावसाने राज्यात धुमाकूळ घातला. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी बच्चू कडू यांनी पुढाकार घेतला. जळगाव येथे शेतकऱ्यांच्या जन आक्रोश मोर्चाला बच्चू कडू उपस्थित होते. या मोर्चा दरम्यान बच्चू कडू आणि गुलाबराव पाटील यांच्यात शाब्दिक वाद झाले. त्यानंतर आता गुलाबराव पाटील यांची भेट न घेताच बच्चू कडू पाळधी गावाच्या वेशीवरून परतले आहेत.

बच्चू कडू येणार असल्याचे समजताच गुलाबराव पाटील यांनी बच्चू कडू यांच्या स्वागतासाठी खास खान्देशी पद्धतीचा भाकरी आणि ठेच्याचा पाहुणचार तयार ठेवलेला होता. बच्चू कडू गुलाबराव पाटील यांची भेट न घेताच पाळधी गावाच्या वेशीवरून परतले. यावेळेस चाळीसगाव येथील कार्यक्रमाला जायचे असल्याने आता गावाच्या वेशीवरूनच परत जातो आहे. मात्र कर्जमाफीचा निर्णय झाल्यानंतर गुलाबराव पाटील यांची भेट घेण्यासाठी पुन्हा येणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.

Bacchu Kadu : मैत्रीत दुरावा!  गुलाबराव पाटलांची भेट न घेताच बच्चू कडू परतले, कारण काय?
Crime News : IPS असल्याचे सांगून लोकांना चुना लावायच्या, पुण्यात मायलेकीचा भंडाफोड, नेमकं जाळ्यात अडकल्या कशा?

यानंतर गुलाबराव पाटील म्हणाले "बच्चू कडू माझे मित्र आहेत त्यांच्यासाठी पाहुणचार तयार केला होता. टीका करणे हे विरोधक म्हणून त्यांचे कामच आहे. कर्जमाफीचा निर्णय शासनाच्या विचारातील असल्याची प्रतिक्रिया यावेळी गुलाबराव पाटील यांनी दिली."

Bacchu Kadu : मैत्रीत दुरावा!  गुलाबराव पाटलांची भेट न घेताच बच्चू कडू परतले, कारण काय?
Sangli News : ...तर सहकारमंत्र्यांच्या दारात उपोषण करेल, महायुतीच्या आमदाराचा घरचा आहेर

दरम्यान, बच्चू कडू जळगाव येथे शेतकऱ्यांच्या जन आक्रोश मोर्चाला उपस्थित झाले होते तेव्हापासून या वादाला सुरुवात झाली. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या गावात मोर्चा घेऊन जाईल असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले होते.

Bacchu Kadu : मैत्रीत दुरावा!  गुलाबराव पाटलांची भेट न घेताच बच्चू कडू परतले, कारण काय?
Crime News : ८ महिन्याच्या गरोदर महिलेला संपवलं अन् मृतदेह फेकला, दुर्गंधी सुटल्याने घटना आली समोर

त्यावर गुलाबराव पाटील यांनी गावात येऊन दाखवा असे आव्हान दिले होते. त्यानंतर मात्र गुलाबराव पाटील यांनी नरमाईची भूमिका घेत जर बच्चू कडू गावात आले तर त्यांच्यासाठी खास खानदेशी पद्धतीचा पाहुणचार करेल असे वक्तव्य केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com