Sangli News : ...तर सहकारमंत्र्यांच्या दारात उपोषण करेल, महायुतीच्या आमदाराचा घरचा आहेर

Maharashtra Politics : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक भरती प्रकरणात आमदार सदाभाऊ खोत यांनी गंभीर आरोप केले आहेत. चौकशी प्रलंबित असतानाही भरतीला परवानगी देण्यात आली असून पारदर्शक भरती न झाल्यास उपोषणाचा इशारा खोत यांनी दिला आहे.
Sangli News : ...तर सहकारमंत्र्यांच्या दारात उपोषण करेल, महायुतीच्या आमदाराचा घरचा आहेर
Sangli NewsSaam Tv
Published On
Summary
  • सांगली जिल्हा बँक भरतीला चौकशी प्रलंबित असतानाही परवानगी देण्यात आली आहे.

  • आमदार सदाभाऊ खोत यांनी भरतीतील भ्रष्टाचारावर गंभीर आरोप केले आहेत.

  • एका जागेसाठी ३० लाख रुपये घेतल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर टीका केली आहे.

  • पारदर्शक भरती न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा खोत यांनी दिला आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये नोकर भरतीला सहकार आयुक्तांनी परवानगी दिलेली आहे. पूर्वीच्या नोकर भरतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आढळले होते. त्या संदर्भामध्ये चौकशी पूर्ण झालेली आहे. या बँकेची चौकशी प्रलंबित असताना नव्यानं ५५९ जागांच्या नोकर भरती करायला परवानगी दिलेली आहे. या भरतीवरून सदाभाऊ खोत यांनी उपोषणाचा इशारा दिला असून "पुढार्‍यांना पैसे खाऊन जवळचे बगलबच्चे बँकेमध्ये भरण्यापेक्षा कर्तबगार लेकरं बँकेमध्येघ्या" असे वक्तव्य आमदार सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

या भरतीवरून आमदार सदाभाऊ खोत यांनी आपल्याच सरकारमधील सहकार मंत्र्यांवर गंभीर आरोप केला आहे. सदाभाऊ खोत यांनी सहकार मंत्र्यांनाच घेरताना एका जागेसाठी तब्बल ३० लाख रुपये दर ठरवला गेल्याचा आरोप केला आहे. सदाभाऊ यांनी सांगली जिल्हा बँकेतील नोकरभरतीला विरोध केला असून एमपीएससीच्या धर्तीवर परीक्षा घेऊन भरती करा, अशी मागणी केली.

Sangli News : ...तर सहकारमंत्र्यांच्या दारात उपोषण करेल, महायुतीच्या आमदाराचा घरचा आहेर
Crime News : IPS असल्याचे सांगून लोकांना चुना लावायच्या, पुण्यात मायलेकीचा भंडाफोड, नेमकं जाळ्यात अडकल्या कशा?

सदाभाऊ खोत म्हणाले की, सहकार मंत्री राष्ट्रवादीतूनच असल्यामुळे त्यांना त्यांचा गोतावळा सांभाळायचा आहे.चांगली शिकलेली अभ्यासू मुलं बँकेमध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे. आणि कोट्यावधी रुपयांचा मलिदा लाटण्यासाठी बँकेची चौकशी सुरू असताना या ठिकाणी नोकरभरतीला परवानगी दिलेली आहे. हे निश्चितपणाने हे अयोग्य आहे.जर आहे असंच घोडा दमटून नेण्याचा प्रयत्न केला तर राज्याच्या सहकार मंत्र्याच्या मुंबईतल्या बंगल्यासमोर मी स्वतः उपोषण करणार असल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं.

Sangli News : ...तर सहकारमंत्र्यांच्या दारात उपोषण करेल, महायुतीच्या आमदाराचा घरचा आहेर
MSRTC Aapli ST App : एसटीचा ठावठिकाणा समजणार, अ‍ॅप नेमकं कसं काम करणार? वाचा सविस्तर

नोकर भरतीच्या निर्णयावर पुढे बोलताना खोत म्हणाले, "राज्याच्या तरुणाला नोकरीची संधी निश्चितपणाने मिळाली पाहिजे. पुढार्‍यांना पैसे खाऊन जवळचे बगलबच्चे बँकेमध्ये भरण्यापेक्षा कर्तबगार लेकरं बँकेमध्ये जाणं गरजेचं आहे. ही भूमिका आमची आहे." असे सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com