MSRTC Aapli ST App : एसटीचा ठावठिकाणा समजणार, अ‍ॅप नेमकं कसं काम करणार? वाचा सविस्तर

MSRTC News : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दसऱ्याच्या मुहूर्तावर “आपली एसटी” ॲप लाँच करण्यात आले आहे. या ॲपमुळे प्रवाशांना बसचे थेट लोकेशन, आगमनाची वेळ आणि मार्गांची माहिती मिळणार आहे. १२ हजार बस व १ लाख मार्गांचे मॅपिंग करून हे ॲप तयार करण्यात आले आहे.
MSRTC Aapli ST App : एसटीचा ठावठिकाणा समजणार, अ‍ॅप नेमकं कसं काम करणार? वाचा सविस्तर
MSRTC NewsSaam Tv
Published On
Summary
  • महाराष्ट्र परिवहन विभागाने “आपली एसटी” ॲप दसऱ्याच्या दिवशी लाँच केले आहे.

  • या ॲपमुळे प्रवाशांना एसटी बसचे थेट लोकेशन आणि आगमनाची वेळ समजणार आहे.

  • १२,००० पेक्षा अधिक बसेस आणि १ लाख मार्गांचे मॅपिंग या ॲपमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

  • मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांना ॲप वापरून अभिप्राय देण्याचे आवाहन केले आहे.

रेल्वे प्रमाणे प्रत्येक थांब्यावर एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना एसटीचा अचुक ठावठीकाणा काळावा, यासाठी " आपली एसटी " या नावाने नवीन ॲप चे दसऱ्याच्या मुहूर्तावरण लोकार्पण करण्यात आले. भविष्यात प्रवाशांना त्याचा चांगला फायदा होईल! तथापि , १२ हजार पेक्षा जास्त बसेस व राज्यभरातील १ लाख पेक्षा जास्त मार्गाचे मॅपिंग करून हे ॲप विकसित केले आहे.

भविष्यात लाखो प्रवासी याचा वापर करणार असल्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काही तांत्रिक त्रुटी निर्माण झाल्यास प्रवाशांनी त्या जरूर सुचित कराव्यात ,असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे. जेणेकरून एक परिपूर्ण ॲप विकसित करण्यास मदत होईल.

MSRTC Aapli ST App : एसटीचा ठावठिकाणा समजणार, अ‍ॅप नेमकं कसं काम करणार? वाचा सविस्तर
Crime News : IPS असल्याचे सांगून लोकांना चुना लावायच्या, पुण्यात मायलेकीचा भंडाफोड, नेमकं जाळ्यात अडकल्या कशा?

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवाशांच्या सोयीसाठी कम्यूटर ॲप नव्या रुपात सादर केलं आहे. या ॲपला ‘आपली एसटी’ (Aapli ST) असे मराठमोळे नाव परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. अर्थात, या ॲपमुळे सर्वसामान्य मराठी प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, सोयीस्कर आणि पारदर्शक होईल यावर अधिक भर दिला जाणार आहे.

MSRTC Aapli ST App : एसटीचा ठावठिकाणा समजणार, अ‍ॅप नेमकं कसं काम करणार? वाचा सविस्तर
Shocking : भिवंडीत धर्मांतराचा खेळ; मुलींच्या डोक्यावर हात ठेवायचा अन्... अमेरिकेतून आलेल्या तरुणाचं 'अघोरी' कृत्य

‘रोजमाल्टा ऑटोटेक लि.’ या कंपनीच्या सहाय्याने विकसित केलेल्या " आपली एसटी " ॲपमुळे प्रवासी आपल्या जवळच्या बसस्थानकाची माहिती मिळवू शकणार आहे. प्रवासी माहिती केंद्राद्वारे (‘Passenger Information System’ ) बस कुठून सुटणार (STD) आणि ती बस थांब्यावर केव्हा पोहोचणार (ETA) याची वस्तुस्थिती माहिती मिळेल. त्यामुळे प्रवाशांना थांब्यावर थांबून वेळ घालवण्याची गरज नाही, तर ते थेट बस उपलब्धतेनुसार थांब्यावर पोहोचू शकतील.

MSRTC Aapli ST App : एसटीचा ठावठिकाणा समजणार, अ‍ॅप नेमकं कसं काम करणार? वाचा सविस्तर
Massage Parlour Fraud : मसाजच्या हौसेने वकिलाचे खाते झालं रिकामं, नग्न अवस्थेत व्हिडिओ काढून लुबाडलं, मुंबईतील धक्कादायक प्रकार

सध्या या ॲपवर राज्यातील तब्बल १२,००० हून अधिक बसेसचे लाईव्ह डेटा उपलब्ध आहे. भविष्यात सर्व बसेस या ॲपच्या कार्यकक्षेत येतील. पुढे प्रवाशांच्या अभिप्रायाच्या आधारे ॲपमध्ये आणखी सुधारणा करण्यात येणार आहेत. तसेच लवकरच एसटीचे (MSRTC ) सध्या असलेल्या तिकिट बुकिंग ॲपमध्येही बसची थेट माहिती (Live Data) समाविष्ट केली जाणार आहे. ज्यामुळे आगाऊ तिकीट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनाही मोठी सुविधा मिळेल.

MSRTC Aapli ST App : एसटीचा ठावठिकाणा समजणार, अ‍ॅप नेमकं कसं काम करणार? वाचा सविस्तर
Dombivli Investment Scam : आकर्षक परताव्याचं आमिष दाखवलं, गुंतवणूकदारांना लुबाडलं, कोट्यवधी रुपयांची फसवणूक

एसटीचा उद्देश प्रवाशांना अधिक विश्वासार्ह, पारदर्शक आणि सुरक्षित सेवा देण्याचा असून, आपली एसटी (Aapli ST) ॲप या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. तसेच महामंडळाने याबाबत प्रवाशांकडून सूचना व अभिप्राय मागवुन , त्यांच्या अपेक्षेनुसार ॲपमध्ये सतत सुधारणा कराव्यात अशी सूचना त्यांनी केली आहे.

MSRTC Aapli ST App : एसटीचा ठावठिकाणा समजणार, अ‍ॅप नेमकं कसं काम करणार? वाचा सविस्तर
Crime News : जंगलात नेलं, गळा दाबला, प्रेमप्रकरणातून अल्पवयीन तरुणीची हत्या; कुडाळमध्ये आरोपीला बेड्या

एसटीचा उद्देश प्रवाशांना अधिक विश्वासार्ह, पारदर्शक आणि सुरक्षित सेवा देण्याचा असून, आपली एसटी (Aapli ST) ॲप या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. तसेच महामंडळाने याबाबत प्रवाशांकडून सूचना व अभिप्राय मागवुन , त्यांच्या अपेक्षेनुसार ॲपमध्ये सतत सुधारणा कराव्यात अशी सूचना मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. सध्या हे ॲप MSRTC commuter app या नावाने प्ले स्टोअर मधून प्रवाशांना डाऊनलोड करून घेता येईल.तथापि, आपली एसटी हे नाव लवकरच प्ले स्टोअर मध्ये दिसू लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com