नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात एक धक्कादायक घटना घडली असून या घटनेमुळे संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. येथील एक व्यक्ती किराणा घेण्यासाठी घराबाहेर पडला होता. मात्र चार दिवस उलटूनही तो घरी परतला नाही. अखेर चार दिवसानंतर त्याचा मृतदेह जळलेला अवस्थेत एका पुलाखाली आढळून आला आहे. या घटनेने नंदुरबारमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात राजेंद्र मराठे नामक व्यक्ती सदाशिव नगरात गेल्या सात वर्षांपासून वास्तव्यास असून शहादा बस आघात बस कंडक्टर म्हणून आपली सेवा देत होते. अगदी मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने त्यांची आगारात आणि कॉलनीत ही ओळख होती. परंतु चार दिवसांपासून ते अचानक बेपत्ता झाल्याने त्यांचा शोधा सुरू झाला. अनेक प्रकारचे तर्क वितर्क लावले जात होते. त्यांच्या मोबाईल नंबरवर कॉल करण्यात येत होते. मात्र त्यांच्याशी कोणत्याही प्रकारच्या संपर्क होत नव्हता. नातेवाईकांनी पोलिसात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
चार दिवसांपासून सुरू असलेला शोध अखेर थांबला आणि रविवारी सकाळी शहादा शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या वैजाली - नांदडे रस्त्या नजीक असलेल्या एका फरशी पुलाखाली राजेंद्र मराठे यांचा मृतदेह आढळला. (Latest Marathi News)
फरशी पुलाखाली मोठ्या संख्येत कुत्रे जमत असल्याने परिसरातील नागरिकांना ही बाब लक्षात आली. घटनेची माहिती मिळताच शहादा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपासणी केली असता अर्धवट जळालेला आणि छिन्नविच्छिन्न झालेल्या मृतदेह पोलिसांना त्या ठिकाणी आढळून आला. मृतदेहाची विटंबना झालेली असून शरीराचे अवयव हे वेगवेगळे झाले असल्याने पोलिसांना दिसले.x`
चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या राजेंद्र मराठे यांचा मृतदेह आढळून आल्याने कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला होता. राजेंद्र मराठे यांना बेपत्ता होण्याआधी निनावी फोन येत असल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं असून त्यांच्या कुणाशीही वाद किंवा भांडण झालेलं नव्हतं. त्यांची हत्या कोणी व का केली? याचा तपास पोलीस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.