SHOCKING! HUSBAND KILLS WIFE, DIES BY SUICIDE IN NANDED DOUBLE MURDER CASE saam tv
क्राईम

नवरा-बायकोमधील वाद टोकाला भिडला,पतीनं पत्नीचा गळा चिरला अन्...; दुहेरी हत्याकांडानं नांदेड हादरलं

Nanded Crime News: नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी तांडा येथे ही घटना घडली. नवरा-बायकोमधील वाद टोकाला गेल्याने ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

Bharat Jadhav

  • नांदेडच्या हिमायतनगरमध्ये दुहेरी हत्याकांडाची घटना.

  • पतीने पत्नीची हत्या करून आत्महत्या केल्याची माहिती.

  • कौटुंबिक वादामुळे सुखी संसार उद्ध्वस्त.

नवरा-बायकोमध्ये भांडण होणं हे सामान्य गोष्ट आहे. बहुतेक जोडप्यांमध्ये वाद होत असतात. पण काहीवेळा हे वादामुळे सुखी संसाराची राख रांगोळी होत असते. अशीच एक धक्कादायक घटना नांदेडच्या हिमायतनगरमध्ये घडली आहे. पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर आत्महत्या करत मृत्यूला कवटाळलं अन् सुखी संसार उद्धवस्त झाला.

दुहेरी हत्याकांडाची घटना हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी तांडा येथे घडली आहे. पायल विनोद राठोड आणि पती विनोद राठोड, अशी मृतांची नावे आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, पायल आपल्या चुलत भावाच्या लग्नासाठी माहेरी आली होती. तिच्यासोबत तिचा पती विनोद राठोड (वय ३५) हा ही आला होता. ते तीन दिवसापासून तांडा येथे आले होते. या दोघांना दोन मुली आणि आठ महिन्याचा मुलगा आहे.

परंतु या दोघांमध्ये ११ मे रोजी काहीतरी वाद झाला. मध्यरात्री नवरा-बायकोमध्ये कडाक्याचं भांडण झालं. यादरम्यान रागाच्या भरात पती विनोदने धारदार शस्त्राने पत्नी पायलच्या गळ्यावर वार केला. रक्तबंबाळ झालेली पायल जागीच कोसळली.

पत्नीची हत्या केल्यानंतर पती विनोद तेथून पसार झाला होता. दुसऱ्या दिवशी १२ मे रोजी धानोरा शिवारातील एका झाडाला त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. विनोद आणि पायल यांना तीन मुले आहेत. सुखी संसार असताना एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याचा तपास पोलिस करत आहेत.या घटनेमुळे बोरगडी तांडा व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

व्यावसायिक तरुणीच्या हत्येनं पुण्यात खळबळ

पुण्यातील मुंढवा परिसरात तरुणीच्या हत्येची घटना घडली आहे. ज्या तरुणीची हत्या झाली आहे, ती ब्युटीपार्लरचा व्यवसाय करत होती. कचरा डेपोजवळ तिचा मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आफरीन सलीम पठाण असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे. ती वडगाव शेरी येथे राहत होती. ती मूळची पालघर येथील रहिवासी होती. गोरखनाथ देवराव शिंदे असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो सध्या चंदननगरमध्ये राहत होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यातील मनोरुग्णालयात तरुणाची आत्महत्या, खिडकीला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

इंदिरा गांधींचंही सोनं न खरेदी करण्याचं आवाहन? मोदींसारखाच इंदिरा गांधींचा 1967 साली निर्णय?

आधी डोकी फोडली, आता सत्तेसाठी एकवटली? अंबरनाथ पालिकेत शिंदेसेना-भाजपची युती?

NEET UG परीक्षा रद्द, आता पुढे काय? विद्यार्थ्यांना पुन्हा नोंदणी करून फी भरावी लागणार का?

तामिळनाडूत शिवसेना स्टाईल बंड, अम्माच्या पक्षात उभी फूट

SCROLL FOR NEXT