Mob Beaten Students CCTV saam Tv
क्राईम

Nanded News: वर्ल्डकप विजयाच्या जल्लोषाला गालबोट; टोळक्याकडून विद्यार्थ्यांना मारहाण, घटना CCTV मध्ये कैद

Mob Beaten Students : विजयाचा जल्लोष साजरा का करता म्हणून एका टोळक्याने घरात घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केली.मारहाणीत ३ ते ४ जण जखमी झालेत. मारहाणीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालीय.

Bharat Jadhav

संजय सुर्यवंशी, साम प्रतिनिधी

टी२० विश्वचषकात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला. या विजयाचा जल्लोष संपूर्ण भारतात साजरा होत आहे. पण या विजयाचा जल्लोषाला नांदेडमध्ये गालबोट लागलं. येथील काही जणांना विजयाचा जल्लोष करणं भावलं नाही. एका टोळक्यानं विजयाचा जल्लोष करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण केलीय. मारहाणीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय.

नांदेड शहरातील श्रीनगर भागात राहणारे गजानन देगलूरकर यांच्या निवासस्थानी भाड्याने राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी भारताच्या विजयाचा जल्लोष साजरा केला. मात्र जल्लोष करणं तेथील शेजारच्यांना आवडलं नाही. तेथील एका टोळक्याने देगलूरकर यांच्या घरात घुसून जल्लोष साजरा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण केली.जवळपास १५ ते २० जणांनी विद्यार्थ्यांना मारहाण केलीय. हातात हॉकी आणि स्टिक घेऊन आलेल्या या टोळक्याने जबर मारहाण केली. यात ३ जण जखमी झालेत.

संपूर्ण देशभरात जल्लोष

टीम इंडियाने सामना जिंकल्यानंतर देशातील प्रत्येक शहरात आणि गावात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. 'भारत माता की जय'च्या घोषणा दिल्या गेल्या यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर एकच आनंद पाहायला मिळाला. सर्वस्तरावरून टीम इंडियातील सर्वच खेळाडूंचे कौतुक केले. मात्र नांदेडमधील श्रीनगर भागात राहणाऱ्या काही लोकांना विजय जल्लोष करणं आवडलं नाही. भारताच्या विजयानंतर जल्लोष करणाऱ्या विद्यार्थ्यांना टोळक्याने हॉकी स्टीकने जबर मारहाण केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Accident: रेसच्या नादात भाजप नगरसेवकाच्या मुलाने घेतला दाम्पत्याचा जीव; अपघाताचा थरारक CCTV Video आला समोर

दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी सरकारचा अॅक्शन प्लॅन तयार; जलसंधारणाच्या कामांना मिळणार वेग

भाजपच्या महिला आमदाराला विषबाधा; व्हेंटिलेटरवर उपचार, प्रकृती चिंताजनक

कॅन्सरग्रस्तांसाठी आशेचा नवा किरण; कॅन्सरला हरवणं शक्य, क्लिनिकल ट्रायलमध्ये शास्त्रज्ञांना मोठं यश

कारवाईनंतरही पुन्हा अतिक्रमण केल्यास गुन्हा; पुणे मनपा आयुक्तांचा व्यापाऱ्यांना कठोर इशारा

SCROLL FOR NEXT