Nanded grandson killed grandmother for money Saam Tv News
क्राईम

Nanded Crime : घरात घुसून आजीला मारलं, दुर्गंधी आल्याने गावकऱ्यांना समजलं; नांदेडमधील 'त्या' हत्येचं धक्कादायक गुढ उलगडलं

Nanded Crime News : गयाबाई रामजी तवर या टेम्भुर्णी येथील रहिवासी आहेत. त्या एकट्याच राहत असून त्यांच्याकडे नऊ एकर जमीन आणि राहतं घर आहे. त्यांच्या तीनही मुलींचं लग्न झालं असून त्या वेगवेगळ्या ठिकाणी राहतात.

Prashant Patil

नांदेड : नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक अशी बातमी समोर आली आहे. आजी आणि नातवच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे. नातवाने पैशांसाठी आजीच्या तोंडात बोळा कोंबून तिची हत्या केलीय. मारोती उर्फ बाळू पांडुरंग वानखेडे (वय ३५) असं नातवाचं नाव आहे. तर त्याने गयाबाई रामजी तवर (वय ७५) असणाऱ्या आजीची पैशांसाठी हत्या केली आहे. ही घटना नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील आहे.

गयाबाई रामजी तवर या टेम्भुर्णी येथील रहिवासी आहेत. त्या एकट्याच राहत असून त्यांच्याकडे नऊ एकर जमीन आणि राहतं घर आहे. त्यांच्या तीनही मुलींचं लग्न झालं असून त्या वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. गयाबाईंनी सोमवारी बँकेतून ९० हजार रुपये काढले होते. तसेच त्यांनी आपल्या मुलीकडे असलेले १ लाख ८४ हजार रुपये किंमतीचे दागिने घरी आणले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जून रोजी आरोपी नातू मारोतीने घरात प्रवेश जात आजीला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि तिची हत्या केली. त्यानंतर घरातील दागिने आणि रोख रक्कम घेऊन तो घटनास्थळावरुन फरार झाला. गुरूवारी रात्रीच्या सुमारास गयाबाईच्या घरातून मृतदेहाचा दुर्गंध येऊ लागला. गावकऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.

या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आणि गयाबाईंच्या मुलींना तसेच नातेवाईकांना घटनास्थळी उपस्थित राहण्यास सांगितलं. नातेवाईकांच्या उपस्थितीनंतर घराचे दार उघडण्यात आले असता, घरात गयाबाईंचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी नातवावर संशय व्यक्त केला. यावेळी पोलिसांचा अंदाज खरा ठरला आहे. पोलिसांनी आरोपी मारोती वानखेडेला ताब्यात घेत अटक केली आहे. यावेळी पोलिसांनी त्याला या हत्येबाबत विचारले असता, त्याने हत्येची कबुली दिली. पैशांच्या हव्यासापोटी आजीला मारल्याचं आरोपी मारोतीनं मान्य केलं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics : भाजप मंत्र्यांकडून ऑपरेशन लोटस; बडा नेता कमळ हाती घेणार?

Accident News : हृदयद्रावक! दिवाळीला मामाच्या गावी जाताना काळाचा घाला; थारच्या धडकेत दोन मुलांसह आई-वडिलांचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT