नागपूर शहराला हादरवून टाकणाऱ्या १४ वर्षीय अथर्व मनोरे अपहरण आणि हत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. यावेळी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केलीये. मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होता.
गुरुवारी हनुमान जयंतीनिमित्त गिट्टीखदान परिसरात निघालेल्या शोभायात्रेदरम्यान त्याचं अपहरण करण्यात आलं होतं. यावेळी कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला होता. शोध घेऊनही त्याच्याबाबत काहीच माहिती मिळत नव्हती. अखेर परवा दुपारी भरतवाडा परिसरात अथर्वचा मृतदेह आढळून आला आणि संपूर्ण घटनेचा उलगडा झाला.
या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे अथर्वचा शेजारी आणि मित्र असलेला जयराम गोपाल यादव हाच या अपहरणामागचा मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलं आहे. पैशांच्या लालसेपोटी त्याने अथर्वचं अपहरण केल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे. जयरामने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने हा कट रचला होता. आरोपी केतन उर्फ कुणाल रमेश शाहू आणि आयुष मोहन शाहू यांनीही त्याला मदत केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी अथर्वच्या कुटुंबाकडून तब्बल ४० ते ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा डाव आखला होता. अपहरण केल्यानंतर त्यांनी अथर्वला एका ठिकाणी ठेवलं होतं. मात्र, अथर्व बेशुद्ध होत नसल्याने आरोपींनी त्याला मारहाण केली. या मारहाणीमध्येच त्याचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
गिट्टीखदान पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आणि आज पहाटेच तिन्ही आरोपींना अटक केलीये. सध्या पोलिसांकडून आरोपींची सखोल चौकशी सुरू असून या प्रकरणामागील आणखी काही तपशील समोर येण्याची शक्यता आहे.
या घटनेमुळे नागपूरात खळबळ उडाली असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. मित्रानेच पैशांसाठी असा जवळच्या मित्राचा घात केल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात धक्का बसला आहे. पोलिसांनी या प्रकरणात कठोर कारवाई करावी, अशी मागणी केलीये जातेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.