Nagpur Crime News Saam Tv
क्राईम

Viral Video: टोईंग व्हॅनच्या कर्मचाऱ्यांची गुंडगिरी; पोलिसांसमोरच तरूणाला शिवागाळ करत बेदम मारहाण, नागपुरातील Video समोर

Nagpur Crime News: नागपूर शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. पोलिसांसमोरच टोईंग व्हॅनच्या कर्मचाऱ्यांची दुचाकी चालकांचा अंगावर धावून जात मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Rohini Gudaghe

Towing Van Employees Hooliganism

नागपूर (Nagpur) शहरात चाललंय तरी काय? असा प्रश्न आता निर्माण होताना दिसतोय. नागपूरात पोलिसांनसमोरच टोईंग व्हॅनचा कर्मचाऱ्यांची गुंडगिरी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. टोईंग व्हॅनच्या कर्मचाऱ्यांची दुचाकी चालकांचा अंगावर धावून जात मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. (Latest Crime News)

कंत्राटदाराला नो पार्किंगमधील वाहनं उचलण्याचे पैसे मिळतात. परंतु हे कर्मचारी गांधी बाग परिसरातील पार्किंगमधील गाडी होते. तेव्हा एका तरूणाने त्यांना पार्किंगमधील गाडी का उचलत आहात? असा प्रश्न (Nagpur Crime News) केला. त्यामुळे तिघांनी या तरुणाला मारहाण केली आहे. वाहतुक पोलीसांसमोरच ही घटना घडली. परंतु वाहतुक पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना न रोखत बघ्यांची भूमिका घेतली. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

टोईंग व्हॅनमधील कर्मचाऱ्यांची तरुणाला मारहाण

गांधीबाग परिसरात वाहतूक पोलिसांच्या टोईंग व्हॅनमधील (Towing Van) तीन कर्मचाऱ्यांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मोबाईल फोनच्या फुटेजमध्ये कैद झाली आहे. हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. त्यामुळे प्रशासनाविरूद्ध नागरिकांच्या मनात रोष निर्माण झाला आहे.

मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली ( Video Viral) आहे. तरुण त्याच्या दुचाकीवर बसलेला असताना हा प्रकार उघडकीस आला. टोईंग व्हॅन आल्यानंतर दोन कर्मचाऱ्यांनी तरुणाजवळ जाऊन त्याला जबरदस्तीने दुचाकीवरून उतरवले. त्याने प्रतिकार करताच त्याला मारहाण करायला सुरूवात झाली.

टोइंग व्हॅनचा कथित गैरवापर

परिस्थिती हिंसक झाली. तिन कर्मचाऱ्यांनी मिळून तरूणाला बेदम मारहाण (Towing Van Employees Hooliganism) केली. घटनास्थळी वाहतूक पोलीस अधिकारी उपस्थित होते. परंतु त्यांनी हाणामारी रोखण्यासाठी कोणताही हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.

व्हिडिओ फुटेज वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पसरले आहे. टोइंग व्हॅनच्या कथित गैरवापराबद्दल प्रश्न निर्माण होत आहेत. या व्हॅन रस्त्यावरून किंवा नो-पार्किंग क्षेत्रातून वाहने उचलण्याच्या उद्देशाने (Crime News) असताना, कायदेशीर पार्किंगच्या जागेवरून वाहने उचलल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar On Election Result: महायुतीच्या विजयाचा फॅक्टर काय? निकाल हाती येताच अजित पवारांनी सगळंच सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातील २१ विधानसभा मतदारासंघाचा निकाल पाहा एका क्लिकवर

Rice Dishes : संडे स्पेशल ब्रंच, बनवा 'या' खास पद्धतीचा राईस

Sweet Potato: रताळी म्हणजे सुपरफूड; हिवाळ्यात रताळी खाण्याचे फायदे

Relation Tips: रिलेशनमध्ये सतत माफी मागावी लागत असेल थांबा अन्यथा…

SCROLL FOR NEXT