crime news Saam tv
क्राईम

Nagpur Crime : नागपुरच्या कारागृहात कैद्यांमध्ये राडा, पाणी भरण्यावरून वाद; पुण्याच्या गँगस्टरकडून जीवघेणा हल्ला

Nagpur News : पुण्याचा कुख्यात गँगस्टर प्रवीण महाजन पुन्हा चर्चेत आला आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहात पाणी भरण्याच्या किरकोळ वादातून त्याने एका कैद्यावर हल्ला केला.

Alisha Khedekar

  • नागपूर कारागृहात गँगस्टर प्रवीण महाजनकडून कैद्यावर हल्ला

  • पाणी भरण्याच्या किरकोळ वादातून कैदी तौसीफ इब्राहिम जखमी

  • धंतोली पोलिस ठाण्यात महाजनविरोधात गुन्हा दाखल

  • सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह; कैद्यांमध्ये भीतीचे वातावरण

पुण्यातील कुख्यात गँगस्टर प्रवीण महाजनचा नवा कारनामा समोर आला आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहात एका किरकोळ वादातून त्याने दुसऱ्या कैद्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने तुरुंगात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कारागृहात पाणी भरण्याच्या वादावरून प्रवीण महाजनने तौसीफ इब्राहिम या कैद्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात तौसीफ जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

या प्रकरणाची माहिती मिळताच तुरुंग हवालदार अमोल ईखनकर यांनी तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी प्रवीण महाजनविरोधात मारहाणीचा गुन्हा नोंदवला आहे. पोलिस अधिक तपास करत असून कैद्यांमधील तणावाचे मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

प्रवीण महाजन हा पुण्यातील कुख्यात गँगस्टर असून ५ मे २०२१ रोजी त्याने बुधवार पेठ परिसरात फरासखाना पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल समीर सय्यद याची हत्या केली होती. या प्रकरणानंतर प्रवीणला बेड्या ठोकण्यात आल्या. सुरक्षेच्या दृष्टीने त्याला पुण्यातील येरवडा कारागृहात ठेवणे धोकादायक असल्याने त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले.

तथापि, अत्यंत सुरक्षित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर कारागृहात प्रवीण महाजनने पुन्हा हिंसक वर्तन करणे ही गंभीर बाब मानली जात आहे. यामुळे कारागृहातील सुरक्षेची पातळी आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल चर्चा सुरू झाली आहे. कैद्यांवर लक्ष ठेवण्यासाठी असलेली यंत्रणा योग्यरीत्या काम करत आहे का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार

Afghanistan Pakistan Tension: अफगाणिस्तानने थोपटले दंड; पाकिस्तानच्या संरक्षणमंत्री आणि ISI प्रमुखांना व्हिसा देण्यास नकार

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांची महाष्ट्राच्या राजकारणात होणार एन्ट्री? कोण काय म्हणालं? वाचा स्पेशल रिपोर्ट

Nashik Crime: नाशिक जिल्हा....; पुस्तकांऐवजी बॅगेत कोयता अन् चॉपर, महाविद्यालीन विद्यार्थ्यांमध्ये भाईगिरीचे फॅड

Hindu Festivals: रक्षाबंधन आणि भाऊबीजमध्ये काय फरक आहे?

SCROLL FOR NEXT