Prostituion In Mall  Saam Tv
क्राईम

Nagpur Crime: नागपुरात स्पा सेंटरच्या नावाखाली 'नको ते धंदे'; पोलिसांकडून परराज्यातील ३ महिलांची सुटका

Illegal Work Under Name Of Spa: नागपूरमध्ये मॉलमध्ये स्पाच्या नावाखाली देहव्यापार सुरू असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन पीडित महिलांची सुटका केली आहे.

Rohini Gudaghe

पराग ढोबळे साम टिव्ही, नागपूर

नागपूरमध्ये (Nagpur) मॉलमध्ये स्पाच्या नावाखाली देहव्यापार सुरू असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन पीडित महिलांची सुटका केली आहे. उपराजधानी नागपूरमध्ये देह व्यापाराचा नवा ट्रेंड समोर आला (Nagpur Crime) आहे. सलून स्पा सेंटरच्या आडून देहव्यापराचा गोरखधंदा सुरू आहे .

जरीपटका भागात सुरू मॉलमध्ये रिलॅस्क स्पा हेअर अँड ब्युटी लॉजमध्ये परराज्यातील महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात (Crime News) होता. आर्थिक मजबुरीचा फायदा घेत देहव्यापार (Illegal Wok In Mall) चालवला जात होता. यात पोलीस विभागाच्या सामाजिक सुरक्षा पथकाने तीन पीडित महिलांची सुटका केली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी देहव्यापार (Prostitution) चालवणाऱ्या रक्षा शुक्ला नामक महिलेला ताब्यात घेतलं आहे. तिच्यावर कारवाई केली आहे. याप्रकरणात समावेश असलेल्या आणखी दोघांचा शोध सुरू आहे. यात मोहम्मद नासीर अब्दुल शकुर भाटी आणि फिरोज अब्दुल शकुर भाटी अशी (Nagpur Crime News) फरार आरोपींची नावे आहेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ३ महिलांची सुटका केली आहे.

हे तिघेही आपल्या आर्थिक फायद्यासाठी पीडित महिलांना पैशांचे आमिष दाखवत (Crime) होते. त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेत होते. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला याप्रकरणाची माहिती मिळाली. माहिती मिळताच जरीपटका येथील जिंजर मॉलमधील रिलॅक्स स्पा द हेअर अँड ब्यूटीवर धाड (Nagpur News) टाकली. यावेळी या स्पामध्ये (Spa) आलिशान रूम कंपार्टमेंट तयार करून देहव्यापार सुरू असल्याची माहिती पीआय सामाजिक सुरक्षा विभाग नागपूर कविता इसारकर यांनी दिली आहे. आयटी सीटी हिंजवडीत देखील अशीच एक घटना काल उघडकीस आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला आज सुट्टी

Accident : पुण्याहून निघाले पण पहाटे काळाचा घाला, भयंकर अपघातात ४ जणांचा मृत्यू, २० जखमी

Famous Director Passes Away : प्रसिद्ध दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ब्रेन स्ट्रोकशी झुंज अपयशी, मनोरंजनविश्वावर शोककळा

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी! पीएम किसानचे ₹२००० कधी येणार; या दिवशी होऊ शकते घोषणा

Chutney Recipe : थंडीत जेवणाच्या पानात असायलाच हवी 'ही' चटणी, मजबूत हाडांसाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT