Prostitution Raket News: धक्कादायक! स्पा सेंटर आणि आयुर्वेदिक केंद्राच्या नावाखाली सुरू होता भलताच प्रकार; आठ तरुणींची पोलिसांकडून सुटका

Pune News: अलिकडच्या ३ दिवसात पुण्यात वेशव्याव्यसाय करणाऱ्या १२ तरुणींची सुटका पोलिसांनी सुटका केली आहे.
Pune Prostitution Raket
Pune Prostitution RaketSaamtv
Published On

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Pune Prostitution Raket Exposed: पुण्यामध्ये अवैधरित्या वेश्या व्यवसाय सुरू असल्याच्या दोन मोठ्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये स्पा सेंटर आणि आयुर्वेदिक केंद्राच्या नावाखाली सुरू असलेला वेश्याव्यवसाय पोलिसांनी उधळून लावला आहे. या कारवाईत पोलिसांनी विमाननगरमधून ६ तर सिंहगडरोड परिसरातून २ अशा एकूण ८ तरुणींची केली वेश्याव्यवसायातून सुटका केली आहे. (Latest Marathi News)

Pune Prostitution Raket
Pune Crime News : नऱ्हेत गोळीबार, नागरिकांमुळे टळली माेठी लूट; युवकांचा सिंहगड पोलिसांकडून शाेध सुरु

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील (Pune) विमाननगर परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती समोर आली होती. पिडित मुलींना पैशाचे अमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केल्याचे केले गेले होते. पोलिसांनी या ठिकाणी छापेमारी करत हा प्रकार उधळून लावत ६ तरुणींची सुटका केली आहे.

तसेच या प्रकरणात विमानतळ पोलिस ठाण्यात मनिकंठ राहुल नायडू, विशाल अगरवाल, नायडू बाई, नितीन माने या आरोपीविरोधात पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Prostitution Raket
Kolhapur Accident News: सुट्टीवर आलेल्या जवानाचा पहिल्याच दिवशी अपघाती मृत्यू; संपूर्ण गावावर शोककळा

तर दुसऱ्या घटनेत सिंहगड रोड परिसरात असणाऱ्या एका आयुर्वेदिक केंद्रावर पोलिसांनी छापेमारी केली असता त्या ठिकाणी वेशव्यासाय सुरू असल्याचे आढळून आले. या ठिकाणी पोलिसांनी २ मुलींची सुटका केली आहे. दरम्यान, पुणे शहरात वारंवार अवैध वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे प्रकार समोर येत आहेत. अलिकडच्या ३ दिवसात पुण्यात वेशव्याव्यसाय करणाऱ्या १२ तरुणींची सुटका पोलिसांनी सुटका केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com