Police investigation underway at the hotel where a young woman was allegedly murdered by her lover in Nagpur. Saam Tv
क्राईम

Nagpur crime : प्रियकराने प्रेयसीला हॉटेलमध्ये बोलावलं; अचानक दोघांमध्ये बिनसलं, धारदार शस्त्राने गळाच चिरला

Nagpur Hotel Murder Case Latest Updates: नागपूरमधील कळमेश्वर रोडवरील हॉटेलमध्ये प्रियकराने प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

Omkar Sonawane

प्रेम प्रकरणातून हल्ली अनेक हत्येच्या घटना घडताना दिसत आहे. कधी एकतर्फी प्रेमातून तर कधी विवाहबाह्य संबधातून देखील खुनाच्या घटना घडतात. अशातच आता नागपूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

शुक्रवारी नागपूर येथील कळमेश्वर रोडवरील फेटरी गावाच्या परिसरातील एका हॉटेलमध्ये प्रियकराने प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत तरुणीचे नाव रुचिता भांगे असून, प्रेम प्रकरणातून झालेल्या या हत्येमुळे संपूर्ण परिसरात मोठा हादरा बसला आहे.

हॉटेलमध्येच दोघांमध्ये वाद झाला. या वादातून संतापलेल्या प्रियकराने चाकूने रुचिताच्या गळ्यावर वार केला. गंभीर जखमी झालेल्या रुचिताचा काही वेळातच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर आरोपी प्रियकराने हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारत घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी पोलिसांनी हत्या गुन्हा दाखल केला असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बाळासाहेब जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रम

Thane Water Shutdown News: ठाण्यात मोठी पाणीबाणी; तब्बल १२ दिवस पाणी कपात, कोणत्या भागांना बसणार फटका?

लाडक्या बहिणींना दिलासा; ई-केवायसीसाठी पुन्हा मुदतवाढ मिळणार|VIDEO

Men Health: चाळीशीनंतर पुरुषांनी ‘हे’ चार Medical चेकअप आवर्जून करा; दुसरी चाचणी सर्वात महत्त्वाची

भाजपची तामिळनाडूवर नजर; स्टॅलिन सरकारविरोधात PM मोदींनी दंड थोपटले, काय आहे फॉर्म्युला?

SCROLL FOR NEXT