Pune Nagpur : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, पुणे ते नागपूर रेल्वे गाड्या २२ दिवस रद्द; कारण काय?

Pune Nagpur Central Railway News : पुणे ते नागपूर दरम्यानच्या महत्त्वाच्या रेल्वेमार्गावर दौंड ते मनमाड दरम्यान सुरू असलेल्या दुहेरीकरणाच्या कामामुळे तब्बल २२ दिवस रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात पुणे–नागपूर एक्सप्रेस, हमसाफर, गरिब रथ तसेच अनेक गाड्या समाविष्ट आहेत.
Pune Nagpur : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, पुणे ते नागपूर रेल्वे गाड्या २२ दिवस रद्द; कारण काय?
Pune Nagpur Central Railway NewsSaam tv
Published On
Summary
  • पुणे ते नागपूर दरम्यान दुहेरीकरणाच्या कामामुळे २२ दिवस रेल्वेगाड्या रद्द

  • दौंड ते मनमाड रेल्वेमार्गावर प्री–नॉन इंटरलॉकिंग व नॉन–इंटरलॉकिंगचे काम सुरू

  • गाड्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय

पुणे ते नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागांतर्गत दौंड ते मनमाड मार्गावर सुरू असलेल्या दुहेरीकरणाच्या कामामुळे अनेक महत्त्वाच्या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या कामामुळे पुण्याहून नागपूरकडे आणि नागपुरातून पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या तब्बल २२ दिवस रद्द करण्यात आल्या आहेत.

पुणे आणि नागपूर दरम्यान रेल्वे वाहतूक प्रवाशांसाठी महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण दुवा आहे. या मार्गावर अनेक गाड्या नियमितपणे सेवा देतात. ज्यात पुणे–नागपूर एक्सप्रेस , पुणे–नागपूर हमसाफर एक्सप्रेस आणि पुणे–नागपूर गरिब रथ एक्सप्रेस हे प्रमुख आहेत. मध्य रेल्वेच्या दौंड ते मनमाड मार्गावर सुरू असलेल्या दुहेरीकरणाच्या कामामुळे अनेक महत्त्वाच्या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Pune Nagpur : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, पुणे ते नागपूर रेल्वे गाड्या २२ दिवस रद्द; कारण काय?
Crime News : दारू पाजली, डोळ्यात मिरची पावडर फेकली, नंतर हंटर आणि दगडाने ठेचलं; प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केली पतीची हत्या

दौंड आणि काष्टी स्थानकांदरम्यान सुरू असलेल्या या कामाचा परिणाम पुणे–नागपूरसह मराठवाडा, विदर्भ तसेच दक्षिण व उत्तर भारताकडे जाणाऱ्या रेल्वेसेवांवर झाला आहे. दुहेरीकरणाच्या अंतिम टप्प्यातील प्री-नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंगचे काम २५ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

Pune Nagpur : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, पुणे ते नागपूर रेल्वे गाड्या २२ दिवस रद्द; कारण काय?
Ajit Pawar : अजित पवारांची झेडपीची तयारी, निवडणुकीआधी मारला मास्टरस्ट्रोक, पुण्यात १, २ नव्हे तर ३ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती

त्यामुळे काही गाड्या २२ दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये पुणे–अमरावती एक्सप्रेस, अमरावती–पुणे एक्सप्रेस, अजनी–पुणे एक्सप्रेस, पुणे–अजनी हमसफर, अजनी–पुणे हमसफर तसेच नागपूर–पुणे एक्सप्रेस यांचा समावेश आहे. या गाड्यांवर अवलंबून असलेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com