Nagpur News Saam tv
क्राईम

Nagpur Crime: पती- पत्नी अन् २ मुले, घरात आढळले चौघांचे मृतदेह; भयंकर घटनेने नागपुर हादरलं

Nagpur Crime News: मृतांमध्ये पती- पत्नी आणि दोन मुलांचा समावेश असून संपूर्ण कुटुंबाने टोकाचे पाऊल का उचचले? याबाबतचे कारण अद्याप समोर आले नाही.

Gangappa Pujari

पराग ढोबळे, नागपुर|ता. २ ऑक्टोंबर

Four Death In Same Family: एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील मोवाड गावात घडलेल्या या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये पती- पत्नी आणि दोन मुलांचा समावेश असून संपूर्ण कुटुंबाने टोकाचे पाऊल का उचचले? याबाबतचे कारण अद्याप समोर आले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.

एकाच घरातील चौघांचे मृतदेह..

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागपुर जिल्ह्यामधील नरखेड तालुक्यातील मोवाड गावात एकाच घरातील चौघांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये पती, पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. या कुटुंबाने सामुहिक आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत असून भयंकर घटनेने गावात भितीचे वातावरण पसरले आहे.

नागपुर हादरलं!

विजय पचोरी (वय, ६८) त्यांच्या पत्नी मालाबाई पचोरी (वय, ५५) मुलगा दीपक पचोरी (वय, ३८) व गणेश पचोरी (वय, ३८) अशी मृतांची नावे आहेत. विजय पचोरी हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत, तर त्यांच्या पत्नी गृहिणी असल्याचे सांगण्यात येत आहे. यामधील तीन मृतदेह हे हात पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आले तर एक मृतदेह फासाला लटकलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे तिघांचे हातपाय बांधून त्यांना फाशी दिल्यानंतर चौथ्या व्यक्तीने स्वतः गळफास घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या बाबतची माहिती मिळताच नागपूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आहेत. तसेच सध्या फॉरेन्सिकची टीमही घटनास्थळी दाखल झाली आहे. दरम्यान, या संपूर्ण कुटुंबाने इतके टोकाचे पाऊल का उचचले असावे? ही सामुहिक आत्महत्या आहे की हत्या? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून पोलीस याबाबतचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Wear Mangalsutra: डेली वेअरसाठी छोटे, नाजूक मंगळसूत्र, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य; विकृत घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

बीडमध्ये पुन्हा खळबळ; लॉजमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू

लोकलच्या डब्याला लागली आग; प्रवाशांची उडाली धावपळ, VIDEO

PAK vs NZ: सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात पावसाची फटकेबाजी; सामना रद्द, कोणत्या संघाच्या स्वप्नावर फेरलं पाणी?

SCROLL FOR NEXT