Mumbai Bandra News Saam tv
क्राईम

Mumbai Shocking : मुंबई हादरली! १६ वर्षीय विद्यार्थिनीवर धावत्या रिक्षात अत्याचार

Mumbai Bandra News : मुंबईतील वांद्रे पश्चिममध्ये १६ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा धावत्या रिक्षात धारदार शस्त्राचा धाक दाखवत विनयभंग करण्यात आला. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

Alisha Khedekar

मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील वांद्रे पश्चिममध्ये धावत्या ऑटो रिक्षात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला धारदार वस्तूने धमकावून तिचा विनयभंग करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या घटनेत आरोपी असलेल्या अफाक खान याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नेमकं काय घडलं ?

मुंबईतील वांद्रे पश्चिम येथे महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा धावत्या रिक्षात विनयभंग करण्यात आला. सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास १६ वर्षीय विद्यार्थिनी महाविद्यालयात जाण्यासाठी निघाली होती. एसव्ही रोडवरील बोस्टन हॉटेलजवळ आरोपी अफाक खान याने जबरदस्तीने रिक्षा थांबवली आणि रिक्षा चालक नाही म्हणत असतानाही तो त्या रिक्षामध्ये बसला. रिक्षा मध्ये बसताच अफाकने थोडं पुढे उतरायचं असल्याचं खोटं कारण सांगून रिक्षाचालकाला रिक्षा सिग्नलच्या पुढे घेऊन जाण्यास भाग पाडले.

रिक्षा सिग्नलच्या पुढे जाताच आरोपीने विद्यार्थिनीला आणि रिक्षाचालकाला धारदार शस्त्राचा धाक दाखवत विद्यार्थिनीवर विनयभंग केला. पुढच्या सिग्नलवर रिक्षा थांबताच आरोपीने रिक्षातून पळ काढला . घाबरलेल्या पीडितेने मात्र कॉलेजला जाण्याऐवजी घरचा रस्ता गाठला. पीडितेने घडलेली घटना कुटुंबाला सांगितली असून कुटुंबीयांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पीडितेने पोलिसांना दिलेल्या जवाबानुसार, आरोपी तिच्या ओळखीचा नसून तो जबरदस्ती रिक्षामध्ये घुसला. रिक्षाचालकाने आणि तरुणीने नकार देऊनही संबंधित आरोपी रिक्षामध्ये बसला. आरोपीने धारदार शस्त्राचा धाक दाखवत पीडितेला धमकावलं आणि तिच्यावर विनयभंग केला असल्याचं पोलिसांनी म्हटलं. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने मुंबई हादरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Independence Day : स्वातंत्र्य दिनाला फ्री पिझ्झा? दर तासाला 75 पिझ्झा फ्री मिळणार?

President Droupadi Murmu: संविधान, लोकशाही....ऑपरेशन सिंदूर ते पहलगाम हल्ला; राष्ट्रपतींच्या संबोधनातील ठळक मुद्दे

Ladki Bahin Yojana : लाखो घरांमध्ये तीन लाडक्यांना लाभ, संभाजीनगरात तब्बल 84 हजार अर्ज; हजारो लाडकींचे अर्ज रडारवर

Shocking : कोचिंग क्लासमधील मुलीवर नराधमाची वाईट नजर; शिक्षक-विद्यार्थिनीचा प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल, परिसरात खळबळ

Crime News : धक्कादायक! मुतखड्याचं ऑपरेशन, डॉक्टरांनी तरूण शेतकऱ्याची किडनीच गायब केली

SCROLL FOR NEXT