Mumbai Crime News Saam TV
क्राईम

Mumbai Crime News: सख्खा भाऊ पक्का वैरी! व्यावसायातील चढाओढीत जीवघेणा हल्ला, घटनेचा थरार CCTV मध्ये कैद

Man Attack On His Brother: दोन डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता हा हल्ला झाला असून हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. यासंदर्भात फिर्यादी यांचा जबाब ओशिवरा पोलिसांनी नोंद करून घेतला आहे.

Ruchika Jadhav

संजय गडदे

Mumbai News:

मुंबईच्या (Mumbai) ओशिवरा परिसरात रियल इस्टेट व्यावसायिकावर काठ्या आणि रॉडने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. जाहीर आलम गुलजार सय्यद (४५वर्षे) यांनी भावाच्या रियल इस्टेट कार्यालयाच्या शेजारीच स्वत:चे कार्यालय सुरू केले. माजीद गुलझार सय्यद यांचे देखील रिअल इस्टेटचे ऑफिस असल्याने ते नाराज होते. शिवाय आपल्या व्यावसायावर याचा परिणाम होईल या भावनेतून माजीद गुलझार सय्यद याने गुंडांच्या मदतीने सख्ख्या भावावर लाठ्या, रॉड आणि कुबड्याने हल्ला केला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दोन डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता हा हल्ला झाला असून हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. यासंदर्भात फिर्यादी यांचा जबाब ओशिवरा पोलिसांनी नोंद करून घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी पश्चिमेकडील ओशिवरा परिसरात मागील अनेक वर्षांपासून माजीद गुलझार सय्यद हे रियल इस्टेट एजंट म्हणून काम पाहत आहेत. त्यांचा लहान भाऊ (Brother) जाहीर आलम गुलजार सय्यद हा देखील त्यांना या कामात मदत करत होता. मात्र एक डिसेंबर 2023 रोजी जाहीर आलम गुलजार सय्यदने स्वतःच्या रियल इस्टेट कार्यालयाचे उद्घाटन केले. त्याचा मोठा भाऊ माजीद गुलजार सय्यद यालाही गोष्ट आवडली नाही. माजिदने याबाबतची नाराजी देखील त्याला बोलून दाखवली.

दरम्यान, २ डिसेंबर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास माजिद याने गुंड प्रवृत्तीच्या दोन लोकांसोबत घेऊन जाहीर आलम गुलजार सय्यद याच्या दुकानात जाऊन शिवीगाळ केली. तसेच दुकान बंद करण्याबाबत धमकावले. मात्र जाहीर आलम गुलजार सय्यद याने दुकान बंद करण्यास नकार दिला. त्यामुळे माजिद आणि त्याच्यासोबत असलेल्या दोन गुंडांनी लाट्या रॉड आणि कुबड्या यांच्या मदतीने जाहीर आलम गुलजार सय्यद याला मारहाण केली.

यासंदर्भात एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी जाहीर आलम गुलजार सय्यद याला ओशिवरा पोलीस ठाण्यात बोलावून तक्रार देण्यास सांगितले. मात्र आईच्या आजारपणाच्या काळजीपोटी जाहीर आलम गुलजार सय्यदने मला कोणतीही तक्रार द्यायची नसल्याचे सांगितले. तसा जबाब देखील पोलिसांनी नोंदवून घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिंदेंच्या शिवसेनेच्या नाशिक संपर्कप्रमुखपदी उदय सामंत यांची नियुक्ती

Ladki Bahin Yojana: या दिवशी लाडकीच्या खात्यात ₹३००० जमा होण्याची शक्यता; मार्च-एप्रिलच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Weather Update : महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, पुढील ३ तास महत्त्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?

Strong Hair Tips: उन्हाळ्यात मजबूत केसांसाठी फॉलो करा या 5 सोप्या टेप्स

Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेसाठी भाजपकडून हालचालींना वेग, ३० जणांची नावं दिल्ली दरबारी; या नेत्यांच्या नावाचा समावेश?

SCROLL FOR NEXT