Mumbai Crime X
क्राईम

Mumbai Crime : दोन हजार देण्यास नकार, ४० वर्षीय मित्राकडून ७६ वर्षीय वृद्धावर अनैसर्गिक अत्याचार

Mumbai News : दोन हजार रुपये देण्यास नकार दिल्याने एका ४० वर्षीय व्यक्तीने ७६ वर्षीय वृद्धावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना मुंबईत घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Yash Shirke

Mumbai : मुंबईच्या जोगेश्वरी येथून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका ४० वर्षांच्या व्यक्तीने ७६ वर्षीय वृद्धावर नैसर्गिक अत्याचार केला आहे. दोन हजार रुपये देण्यास नकार दिल्याने आरोपीने हे कृत्य केले आहे. अत्याचारानंतर बेदम मारहाणीमुळे वृद्धाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत वृद्ध व्यक्ती सेवानिवृत्त होते. शासकीय सेवेतून ते निवृत्त झाले होते. वृद्ध व्यक्त आणि आरोपी १६ मे रोजी दारु पिण्यासाठी भेटले होते. जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने आरोपीने वृद्धाला आपल्या घरी नेले. घरी गेल्यावर वृद्धाने 'मी उद्या गावी जाणार आहे, माझ्या मुलाने खर्चासाठी दोन हजार रुपये दिले आहेत, असे आरोपीला सांगितले.

आरोपीने लगेच त्या दोन हजार रुपयांची मागणी केली. त्यावर वृद्धाने नकार दिला. त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. आरोपीने वृद्धाला मारहाण करायला सुरुवात केली. बेदम मारहाण केल्यानंतर वृद्धावर अनैसर्गिक अत्याचार देखील केले. १७ मे रोजी पहाटेच्या सुमारास वृद्ध व्यक्ती त्यांच्या घरी परतले. जखमी अवस्थेत पाहून कुटुंबियांनी त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

प्रकृती खाल्यावल्यामुळे वृद्धास कूपर रुग्णालयात नेण्यात आले. सोमवारी (१९ मे) दुपारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. लाज वाटल्यामुळे वृद्धाने अनैसर्गिक अत्याचाराबद्दल डॉक्टरांना काही सांगितले नव्हते. मारहाणीमुळे १७ मे रोजी रात्री पोलीस ठाण्यात वृद्धाच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केली, तेव्हा वृद्ध व्यक्तीने अनैसर्गिक अत्याचाराबाबत सांगितले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हॉटेल स्टाईल व्हेज मंचाव सूप घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Cancer Risk : सावधान! तासंतास एका जागेवर बसल्यामुळे होऊ शकतो कॅन्सर, तज्ज्ञांनी सांगितली धक्कादायक कारणं

Maharashtra News Live Update: खालापूर जवळील इमॅजिका पार्कमध्ये 47 वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Famous Singer : "हाच माझा जोडीदार..."; प्रसिद्ध गायिकेने Live कॉन्सर्टमध्ये दिली प्रेमाची कबुली, होणाऱ्या नवऱ्यासोबत केला रोमँटिक डान्स |VIDEO

Beed Crime: बीड हादरले! मध्यरात्री रक्तरंजित थरार, चाकूने सपासप वार करत तरुणाला जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT