Mumbai Crime Saam TV
क्राईम

Mumbai Crime: BCom चा पेपर फोडल्याप्रकरणी कोचिंग क्लास संचालकाला अटक; आझाद मैदान पोलिसांची धडक कारवाई

Crime News: २ नोव्हेंबर रोजी पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आतापर्यंत २ विद्यार्थ्यांसह अन्य एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. तपासात पुढे ४० वर्षीय राजेश यांच नाव देखील समोर आलं आहे.

Ruchika Jadhav

Mumbai:

मुंबईमधून BCom चा पेपर फोडल्याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी कोचिंग क्लासमधील संचालकाला ताब्यात घेतलं आहे. बीकॉमचा पाचव्या सेमिस्टरचा पेपर फोडल्यामुळे शनिवारी पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश शर्मा असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. गोरेगाव येथे त्यांचा कोचिंग क्लास आहे. पेपर फुटीची घटना ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी घडली होती. तर २ नोव्हेंबर रोजी पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी आतापर्यंत २ विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. तपासात पुढे ४० वर्षीय राजेश यांचं नाव देखील समोर आलं आहे.

आझाद मैदान पोलिसांनी याआधी एका २० वर्षीय विद्यार्थ्यावर आणि त्याच्या अज्ञात साथीदारावर पाचव्या सेमिस्टरमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. तसेच प्रयोगशाळा सहाय्यक रजनीकांत गजानन मौर्य याच्यावर देखील या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. रजनीकांतची चौकशी सुरु असताना राजेश शर्मा यांनीच त्याला ही प्रत पाठल्याचं त्याने सांगितलं होतं.

नेमकं काय घडलं?

बीकॉमच्या पाचव्या सेमिस्टरचा पेपर सुरू होता तेव्हा परीक्षा केंद्रावर निरीक्षक म्हणून तैनात असलेल्या व्यक्तीला एक विद्यार्थी कॉपी करत असल्याचं दिसलं. त्यामुळे त्यांनी त्या मुलाची तपासणी केली, तेव्हा त्याच्याकडे मोबाईल फोन असल्याचं समलं. या फोनमध्ये प्रश्नपत्रीकेचा फोटो देखील मिळाला.

विद्यार्थ्याचा फोन परीक्षकांनी जप्त केला आणि ही बाब मुंबई विद्यापीठाच्या उच्च अधिकाऱ्यांना कळवली. तपासादरम्यान भिवंडीतील एका महाविद्यालयातून पेपर फुटल्याची माहिती मिळाली. तपासात पोलिसांनी मोर्याला ठाण्यातून अटक केली. त्यानंतर कोचिंग क्लासचे संचालक राजेश शर्मा यांना देखील ताब्यात घेतलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पत्नीवर अनैतिक संबंधाचा संशय, पती अन् मित्राकडून आळीपाळीनं बलात्कार; नंतर हात पाय बांधून नदीत फेकून दिलं

Aneet Padda : 'सैयारा'च्या यशानंतर अनीत पड्डाला लागला जॅकपॉट, मिळाली मोठ्या प्रोजेक्टची ऑफर

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Aadhar Card Link असतानाही मोबाईल नंबर बंद झाला? अपडेटसाठी लागतील फक्त ५ मिनिट, कोणत्या झंझटशिवाय होणार काम

Super Earth discovery: नासाने शोधला Super-Earth! पृथ्वीपेक्षा 36 पट मोठा आहे ग्रह; वाचा शास्त्रज्ञांनी कसा शोधला?

SCROLL FOR NEXT