Versova Beach incident: Woman threatened; police seize country-made pistol and weapons from accused. Saam Tv
क्राईम

Crime News: वर्सोवा बीच परिसरात महिलेला धमकी; आरोपीकडून गावठी पिस्तूल जप्त

Crime News: वर्सोवा बीचजवळ एका महिलेला धमकावल्याची घटना घडलीय. मुंबई पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि एक देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतूस आणि एक चॉपर जप्त केले. संपूर्ण माहिती येथे आहे.

Bharat Jadhav

  • वर्सोवा बीच परिसरात महिलेला फोन करून अश्लील शिवीगाळ

  • आरोपी रवी ईश्वर गायकवाड नवी मुंबई येथून अटक

  • पोलिसांनी गावठी पिस्तूल, तीन काडतूस आणि चॉपर जप्त केला.

संजय गडदे, साम प्रतिनिधी

वर्सोवा येथील बरिस्ता बीच चौपाटी परिसरात फिरायला आलेल्या महिलेला शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी रबाळे MIDC, नवी मुंबई येथे राहणाऱ्या रवी ईश्वर गायकवाड या आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्याकडून गावठी पिस्तूल, तीन जिवंत काडतूस आणि चॉपर असा घातक शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

फिर्यादी रमा महेंद्र लोदी (वय 28) या 23 ते 24 नोव्हेंबर दरम्यान वर्सोवा बिच परिसरात फिरायला आल्या असता त्यांचा भाऊ असलेला आरोपीने फोन करून 30,000 रुपये खर्चासाठी मागणी केली. फिर्यादीने नकार दिल्यावर आरोपीने संतापून अश्लील शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नोंद करण्यात आला होता.

तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीचा शोध घेत रबाळे MIDC परिसरातून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या शस्त्रांवरून गुन्ह्यात शस्त्रांकरीता कलम 3, 4, 25 तसेच म.पो.कायदा कलम 37(1), 135 यांची भर करण्यात आली.आरोपी रवी गायकवाड याचे पूर्वीचेही गुन्हे उघड झाले आहेत.

ही कारवाई वपोनि दीपशिखा वारे, पोनि विवेक दाभोळकर, पु.उ.नि. प्रशांत कांबळे व पोह.पवार ,पोशि इनामदार ,किंजळकर , जाधव , परदेशी यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ethiopia Volcano: ज्वालामुखीत भस्म होणार जग? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भारतावर संकट?

Shocking: तिकीट तपासताना वाद, टीसीने धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार, तब्बल 10 वर्षांचा तुरुंगवास

SCROLL FOR NEXT