Youth Friend killed Saam Tv
क्राईम

Mumbai News : ३० रूपयांचा वाद जीवावर बेतला; मध्यरात्रीच मित्राने केला घात, मुंबईत खळबळ

Youth Friend killed Dispute Over 30 Rs At Kurla : मुंबईमध्ये एका तरूणाने आपल्या मित्राची हत्या केल्याचं समोर आलंय. कुर्ला परिसरात ही घटना घडलेली आहे.

Rohini Gudaghe

सचिन गाड, साम टीव्ही मुंबई

मुंबईतील कुर्ला परिसरामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी तपास केला असता त्यांना तरूणानेच त्याच्या मित्राची हत्या केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती दिलीय. सोमवारी १२ ऑगस्ट रोजी पहाटे ही घटना उघडकीस आली होती.

नेमकी काय आहे घटना?

याबाबत सविस्तर वृत्त असं की, कुर्ल्यातील पॅलेस रेसिडेन्सी बार बाहेर सोमवारी १२ ऑगस्ट रोजी पहाटे एक मृतदेह आढळला होता. तो मृतदेह २९ वर्षीय चक्कन अली नावाच्या व्यक्तीचा (Mumbai Crime News) होता. पोलिसांनी याप्रकरणी तपास केला असता, त्यांना चक्कन अलीची हत्या त्याच्या मित्रानेच केली असल्याची माहिती मिळाली. त्यावरून मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ५ ने आरोपीला अटक केली. कुर्ल्यातील पॅलेस रेसिडेन्सी बार बाहेर पोलिसांनी आरोपी सैफ जहिद अली याला बेड्या ठोकल्या.

कुर्ला परिसरातील घटना

रविवारी रात्री हे दोघेही धारावीतून कुर्ल्याला रिक्षाने आले होते. त्यावेळी रिक्षाचे भाडे ३० रूपये झाले होते. हे ३० रूपये कोणी द्यायचे? यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. शा‍ब्दिक बाचाबाचीचे हाणामारीत रूपांतर (Friend killed) झालं. वाद एवढा वाढला की, रागाच्या भरात सैफने चक्कनला गंभीर जखमी केलं आणि पसार झाला. पहाटेच्या सुमारास चक्कनला रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. मात्र, त्याला डॉक्टरांनी दाखलपूर्व मयत घोषित केलं. त्यामुळे मोठी खळबळ उडाली.

३० रूपयांच्या वादातून मित्राची हत्या

चक्कनच्या मृ्त्युनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू (Mumbai News) केला. तेव्हा त्यांना आरोपी उत्तर प्रदेशच्या गोंडा येथील मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तपास यंत्रणा वेगात फिरवत आरोपीला कल्याण रेल्वे स्थानकातून अटक केली. मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ५ ने ही कारवाई केल्याची माहिती मिळत (Crime News) आहे. दिवसेंदिवस शहरात गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. आता केवळ ३० रूपयांच्या वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना कुर्ला परिसरातून समोर आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Men Perosnality: महिलांना कसे पुरुष आवडतात?

माणिकराव कोकाटेंचा निकाल लागला, हायकोर्टात काय घडलं |VIDEO

तुरुंगवास टळला, पण शिक्षा कायम; माणिकराव कोकाटेंना न्यायालयाचा दिलासा की झटका? कोर्टात काय घडलं?

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटेंना 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात केसांना तेल कधी लावावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT