dating apps fraud Saam Tv
क्राईम

Mumbai News : मुंबईत पहिलीच भेट, क्लब आणि हजारोंचं बिल! तरुणांची डेटिंग अॅपवरून फसवणूक

Rohini Gudaghe

संजय गडदे, साम टीव्ही मुंबई

एकटेपणा दूर करण्यासाठी तरुणांसोबत मध्यमवयीन लोक हल्ली डेटिंग ॲपचा वापर करतात. टिंडर या डेटिंग या ॲपवर ओळख झालेल्या तरुणींच्या मदतीने शेकडो तरुणांना गंडवण्याचा प्रकार समोर आलाय. सुरुवातीला गोडगोड बाेलणारी 'डेट'नंतर त्या तरुणांना चांगलीच गोत्यात आणत असल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत.

या डेटिंग ॲपच्या माध्यमातून खा, प्या आणि कलटी मारा..., असा नवीनच स्कॅम सध्या मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील वीरा देसाई रोड परिसरात असलेल्या द रेड रूम आणि गॉड फादर नावाच्या हॉटेलमध्ये उघडकीस आलाय. टिंडर या ॲपच्या माध्यमातून ओळख झालेली (Mumbai News) तरुणी ही तरुणांना 'द रेड रूम किंवा गॉडफायदार'सारख्या हॉटेलमध्ये भेटायला बोलावते. त्या ठिकाणी अवघ्या तास दोन तासातच महागडे पेय किंवा खाद्यपदार्थ ऑर्डर करून खाऊन पिऊन झाल्यावर काहीतरी कारण सांगून त्या ठिकाणाहून तरुणी कलटी मारून पळून जात असल्याचं समोर आलंय.

डेटिंग ॲपचा वापर

त्यानंतर आलेले किमान ४५ ते ५० हजाराचे बिल मात्र पीडिताच्या खिशातून हॉटेल मॅनेजमेंट आणि त्या ठिकाणी असणारे बाऊन्सर वसूल करत असे. मात्र, टिंडर ॲपवर ओळख झालेल्या तरुणीचा नंतर नंबर देखील लागत नाही. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे ध्यानात येताच काही तरुणांनी मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर या संदर्भात तक्रारी नोंदवल्या (Mumbai Crime News) आहेत. सध्या याप्रकरणी आंबोली पोलिसांकडून ते ॲप कोण ऑपरेट करत आहे? त्यात कोणकोणत्या मुली सहभागी आहेत आणि हॉटेलचा नेमका रोल काय? याचा तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई शहरात शिक्षण किंवा नोकरीसाठी आलेले अनेक तरुण हे या स्कॅमचे बळी ठरले आहेत. मात्र, बदनामी होईल म्हणून यातील अनेकांनी पोलिसांकडे तक्रार देण्यास टाळाटाळ केली. एकटेपणा घालवण्यासाठी ऑनलाईन डेटिंग ॲपचा वापर करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहेत. अशातच ज्या तरुणांनी टिंडर या डेटिंग ॲपच्या साहाय्याने तरुणींची मैत्री करण्याचा मार्ग (people cheated on dating apps) निवडला. त्या तरुणांना या मार्गाने चांगलेच अडचणीत आणले आहे. टिंडर ॲपवरून निवडलेली मुलगी आपण दिल्लीचे असल्याचे सांगते. मुंबईत मावशीकडे राहत असून मला मुंबईत कोणी मित्र नाही, मला मुंबईत फारसे काही माहिती नाही असं तरुणांना सांगते. ती तरुणी त्या तरुणाला भेटण्यासाठी अंधेरी पश्चिमेकडील डी एन नगर मेट्रो स्थानक परिसरात बोलावून जवळच असलेल्या आझाद नगर परिसरातील क्रिस्टल पॅराडाईज इथे असणाऱ्या द गॉड फादर या क्लबमध्ये घेऊन जात असे.

तरूणांची फसवणूक

तिथे जाताच तरुणी वेगवेगळ्या प्रकारची महागडे पेय आणि खाद्यपदार्थ मागवत असे. तास दीड तासानंतर वेटर येऊन त्या तरुणाला त्यांच्या बजेट विषयी विचारतो, मात्र तरुण आपलं असं काही फिक्स नाही, असं सांगतो. तेव्हा वेटरकडून आत्तापर्यंत ४५ हजार रुपयांचे बिल झालं असल्याचं सांगण्यात आल्यावर तरुणाला मात्र चांगलाच धक्का बसला. म्हणून त्या ठिकाणावरून बाहेर पडण्याचा त्या तरुणाने निर्णय (dating apps fraud) घेतला. थोड्याच वेळात ५५ हजार रुपयांचे बिल झाल्याचं पुन्हा सांगण्यात आलं. तोपर्यंत तरुणी त्या ठिकाणावरून गायब झाली शेवटी तरुणाला ते ५५ हजार रुपये बिल भरावं लागलं. तरुणाने अंदाज लावला होता की, जास्तीत जास्त दहा हजार बिल होईल, परंतु इतकं जास्त बिल आल्यामुळे तरूणाला मोठा धक्का बसला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT