mumbai crime Saam Tv
क्राईम

Mumbai Crime News: RTI मधून माहिती मागवल्याचा राग, घरात घुसून दिली जीवे मारण्याची धमकी; सरकारी कर्मचाऱ्याचा प्रताप

Clerk Assaulted Person Who Seeking Information: नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माहिती अधिकार कायद्यानुसार माहिती मागितली म्हणून अधिकाऱ्याने थेट घरी जावून धमकावले आहे.

Rohini Gudaghe

Clerk Assaulted Person In Navi Mumbai

माहिती अधिकार (RTI) हा सर्वसामान्यांसाठी आहे. याअंतर्गत आपल्याला एखाद्या गोष्टीविषयी सरकारी अधिकाऱ्यांकडून माहिती मागवण्याचा हक्क आहे. परंतु याच अधिकाराखाली माहिती मागितल्यानंतर अधिकारी प्रचंड संतापला आहे. ही घटना नवी मुंबईतुन समोर आली आहे. हे प्रकरण नक्की काय आहे, ते आपण जाणून घेऊ या.  (Latest Crime News)

माहिती अधिकारात माहिती मागवल्याचा राग अनावर झालेल्या अधिकाऱ्याने थेट माहिती मागवणाऱ्याचे घर गाठत दमदाटी केल्याचा प्रकार (Clerk Assaulted Person Who Seeking Information) समोर आला आहे. माहिती अधिकार कायद्यानुसार माहिती मागितली, म्हणून घरी जाऊन जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप या अधिकाऱ्यावर केला जात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नक्की काय घडलं

हा धक्कादायक प्रताप नवी मुंबई कोकण विभागीय आयुक्त भवनमधील मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यालयात कार्यरत असलेल्या लिपिकाचा आहे. संतोष सोनावणे असं या लिपिकाचं नाव आहे. त्याच्याबाबत तक्रारदाराने माहिती अधिकारात कोकण विभागीय आयुक्त कार्यालय नवी मुंबई येथे अर्ज ( Crime News) केला होता.

या अर्जात संतोष सोनावणे हे शासकीय कर्मचारी आहेत. ते घाटकोपरच्या एका गृहनिर्माण संस्थेमध्ये सचिव आहेत. शासकीय कर्मचाऱ्याला अशा पदावर राहण्यासाठी शासनाची पूर्व परवानगी घ्यावी लागते, ती सोनावणे यांनी घेतली आहे का? याबाबत माहिती (Right To Information Act) मागितली गेली होती.

कडक कारवाईची मागणी

दरम्यान माहिती अधिकाराच्या अंतर्गत ही माहिती मागितली गेली होती. या घटनेने संतप्त होऊन लिपिक संतोष सोनावणे आरटीआयकर्त्याच्या घरी पोहोचले. त्याच्या घरी जाऊन धमकी दिल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ (Mumbai Crime) माजली होती. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

तसंच माहिती मागवणाऱ्याची ओळख सोनावणे यांच्याकडे उघड करणाऱ्यावर देखील कडक कारवाई करावी, अशी मागणी आता आरटीआयकर्त्याने मुख्यमंत्री कार्यालय, कोकण विभागीय आयुक्तांच्या कार्यालयाकडे केली (Navi Mumbai News) आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून मतमोजणीपूर्वी महत्त्वाचे पाऊल पाऊल

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT