Crime News Saam TV
क्राईम

Crime News : कोचिंग सेंटर चालवणाऱ्या तीन भावांकडून विद्यार्थीनीवर अत्याचार; मुंबईमधील खळबळजनक घटना

Mumbai Crime News : क्लास संपल्यावर देखील जास्त वेळ थांबवून उशिरा सोडलं जायतं. तिन्ही सरांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केला असल्याचं या मुलीने म्हटलं आहे.

Ruchika Jadhav

गेल्या दोन वर्षांपासून एक विद्यार्थाीनीवर लैंगिक अत्याचाराची आणखी एक उघड झाली आहे. कोचिंग सेंटर चालवणाऱ्या तीन भावांकडून या १५ वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. गेल्या २ वर्षांपासून पीडिता हा आत्याचार सहन करत आहे, असं तिने पोलिसांना सांगितलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, दक्षिण मुंबईत ही घटना घडली आहे. कोचिंग सेंटरमध्ये मला लेक्चर सुरू होण्याआधी लवकर बोलवलं जायचं. त्यानंतर क्लास संपल्यावर देखील जास्त वेळ थांबवून उशिरा सोडलं जायतं. तिन्ही सरांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केला असल्याचं या मुलीने म्हटलं आहे.

बाल विकास केंद्राच्या अधिकाऱ्यांकडून या मुलीचे समुपदेशन सुरू होते. त्यावेळी तिने या सर्व गोष्टींचा उलगडा केला आहे. मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं समजताच बाल विकास केंद्राच्या अधिकाऱ्यांकडून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत दोन भावांना अटक केलीये. तर मोठा भाऊ अद्याप फरार आहे.

तिन्ही भाऊ २४, २५ आणि २७ या वयोगटातील आहेत. ते दक्षिण मुंबईत राहतात आणि एक कोचिंग सेंटर चालवतात. येथे ७वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांचा क्लास घेतला जातो. यामध्ये ३५ ते ४० मुली शिक्षण घेतात.

२०२२ मध्ये या मुलीच्या पालकांचा घटस्फोट झाला. त्यामुळे ती आपल्या आईसह राहत होती. यावेळी तिने नवीन शाळेत प्रवेश घेतला. शाळा नवीन असल्याने ती जास्त टिचर्ससह बोलत नव्हती तसेच अन्य विद्यार्थ्यांशी सुद्धा कमी बोलायची. त्यामुळे अभ्यासातील अडचणी दूर करण्यासाठी तिने कोचिंग सेंटर देखील लावलं होतं. काही दिवसांनी तिच्या आईला मुलीच्या वागण्यात बराच बदल जाणवला. त्यामुळे २०२३ मध्ये बाल विकास केंद्राशी संपर्कसाधत तिचे समुपदेशन सुरू करण्यात आले. काही दिवसांनी तिने येथे जाणे बंद केले.

त्यानंतर पीडिता पुन्हा फेब्रुवारी २०२४ मध्ये येथे दाखल झाली. यावेळी तिने तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल माहिती दिली. तसेच बदनामीच्या भीतीने आपल्या आईला याबद्दल काही सांगू नये असं म्हटलं. मात्र त्यांनी तिच्या आईला सांगितले. आईला सांगितल्यावर भीतीने आईने देखील पोलिसांत तक्रार करण्यास नकार दिला. त्यामुळे बाल विकास केंद्राच्या अधिकाऱ्यांकडून पोलिसात गुन्हा दाखल असून याबाबत अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT