Pune crime Saam tv
क्राईम

Mumbai Crime : चेंबुर हादरलं! रिक्षा चालकाने केला १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Minor girl Physically abused by rickshaw driver In Chembur : चेंबुरमध्ये १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडलेली आहे. रिक्षा चालकानेच हे भयंकर कृत केल्याचा संशय पोलिसांना आहे.

Rohini Gudaghe

सचिन गाड, साम टीव्ही मुंबई

बदलापूरनंतर आता चेंबुरमधून धक्कादायक घटना समोर आलीय. रिक्षा चालकाने १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर रिक्षा चालकाने लैंगिक अत्याचार केलाय. ही घटना काल १४ सप्टेंबर रोजी उघडकीस आलीय. शाळेत जात असताना रिक्षा चालकाने अल्पवयीन मुलीवर हात टाकला. या मुलीला पडक्या इमारतीत नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचं समोर आलंय.

या रिक्षा चालकाने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर त्याने पीडितेला आईला काही न सांगण्याची धमकी दिली. अन्यथा आईला मारून टाकण्याची टाकेन, असं म्हणत पुन्हा (Mumbai Crime News) धमकावलं. ही धक्कादायक घटना चेंबूरमध्ये घडली आहे. रिक्षा चालकाविरोधात विनयभंग तसेच बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यांतर्गत (पॉक्सो) गुन्हा दाखल करण्यात आलाय.

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

अनोळखी रिक्षा चालकाचा पोलिसांनी शोध सुरू केलाय. याआधी देखील आरोपीने पीडित मुलीसोबत असा प्रकार केल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी तपासाची सुत्रं वेगाने फिरवली (Minor girl Physically abused by rickshaw driver) आहेत. परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी करून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. गुन्हे शाखेने देखील तपासाला सुरवात केलीय. आरोपीच्या लवकरात लवकर मुसक्या आवळल्या जातील, असं आश्वासन पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबीयांना दिलंय.

पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे शहरातील दोन ज्येष्ठ नागरिकांनी अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याच्या २ धक्कादायक घटना समोर आल्यात. यामधील एका घटनेत सात वर्ष वय असलेल्या अल्पवयीन मुलीच्या गळ्याला चाकू लावून ७८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने अत्याचार (Chembur news) केलाय. तर, दुसऱ्या घटनेत ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचं उघडकीस आलंय. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यामध्ये (crime news) दोघांविरुद्ध पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kiwi Benefits: थंडीत किवी खाल्ल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

३ सीनिअर अधिकारी, २० पोलीस अन् गाड्यांचा ताफा; माणिकराव कोकाटेंच्या अटकेसाठी मुंबईकडे मोठा फौजफाटा | VIDEO

Success Story : वडिलांचं छत्र हरपलं, मजुरी करणाऱ्या आईचं पाठबळ; आता घेतलीय वैश्विक भरारी, गोल्डन गर्ल श्वेताची प्रेरणादायी झेप

Mumbai Traffic Alert: मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर दीड तासापासून वाहतूक कोंडी|Video Viral

Maharashtra Live News Update: गेवराई शहरातील महाविद्यालयीन तरूणी अपहरण प्रकरणात पोलिसांना यश

SCROLL FOR NEXT