Mumbai News Saamtv
क्राईम

Mumbai News: मोठी कारवाई! मुंबईत एमडी ड्रग्स बनवणाऱ्या फॅक्टरीचा पर्दाफाश; तब्बल १ कोटी ६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Mumbai News: मुंबईच्या चारकोप परिसरात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये एक कोटी साठ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Gangappa Pujari

संजय गडदे, मुंबई|ता. ११ जानेवारी २०२४

Mumbai Crime News:

राज्यात ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरण गाजत असतानाच आता मुंबईच्या मालवणी पोलिसांनी एमडी ड्रस बनवणाऱ्या फॅक्टरी चा पर्दाफाश केला आहे. मुंबईच्या चारकोप परिसरात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये एक कोटी साठ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

राज्यात ड्रग्स माफिया ललित पाटील (Lalit Patil Case) प्रकरण गाजत असतानाच आता मुंबईच्या मालवणी पोलिसांनी एमडी ड्रस बनवणाऱ्या फॅक्टरी चा पर्दाफाश केला आहे. दोन उच्चशिक्षित तरुणांकडून चारकोप परिसरातील झोपडपट्टी परिसरातील झोपडीच्या पहिल्या माळ्यावर हा कारखाना सुरू करण्यात आला होता.

याप्रकरणी कारवाई करत मालवणी पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. अब्रार इब्राहिम शेख (३० वर्ष) मूर आलम मेहबूब अलम चौधरी (२४ वर्ष) अशी अटक करण्यात आलेल्या दोन तरुणांची आहेत. या कारवाईत मालवणी पोलिसांनी एकूण एक कोटी 60 लाख रुपये किमतीचा मुद्देमान या कारवाईदरम्यान हस्तगत केला आहे.

सध्या दोनही आरोपी मालवणी पोलिसांच्या ताब्यात असून कारखान्यात तयार झालेले एमडी ड्रग्स हे कोणा कोणाला विक्री करत होते? या प्रकरणाचा ललित पाटील प्रकरणाशी काही संबंध आहे का? या संदर्भात मालवणी पोलीस अधिकचा तपास करत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हिंगोलीत लाखो रुपयांचा गांजा पकडला.

हिंगोली (Hingoli) पोलिसांनी अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आरोपी विरोधात मोठी कार्यवाही केली आहे. आंतरराज्यातून हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील खुदनापुर शिवारातील शेतात 89 किलो सुका गांजा साठून ठेवल्याची गोपिनी माहिती मिळाली होती.

त्यावरून हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत कार्यवाही केली आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी आदिनाथ नागोराव चव्हाण या आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून जप्त केलेल्या गांजाची एकुन किंमत 17 लाख 83 हजार 960 रुपये इतकी आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT