Mumbai Crime Saam Tv
क्राईम

Crime: सोशल मीडियावरून मैत्री, नंतर शारीरिक संबंध; व्हिडिओ काढून धमकी; ३ पानी चिठ्ठी लिहून CAची आत्महत्या

Mumbai Crime: मुंबईमध्ये सीएने आत्महत्या केल्याची घटनेने खळबळ उडाली आहे. शरीरसंबंधाचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत एका तरुणीने तिच्या मित्रासोबत या सीएचा छळ केला. त्यांच्याकडून ३ कोटी रुपये घेण्यात आले होते.

Priya More

मुंबईच्या सांताक्रुज पूर्वेकडील वाकोलामध्ये नामांकित सीएने ब्लॅकमेलिंग आणि खंडणीला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. शारीरिक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी आणि त्यासाठी १८ महिन्यात सीए असणाऱ्या तरुणाकडून ३ कोटी रुपये उकळण्यात आले. बदनामीच्या भीतीने शनिवारी या सीएने विष पिऊन आत्महत्या केली. राज मोरे असं या सीएचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी सीएने ३ पानांची चिठ्ठी लिहून आत्महत्येस जबाबदार असलेल्या व्यक्तींची नावे लिहिली. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाकोला परिसरात राहणारे सीए राज मोरे यांची दोन वर्षांपूर्वी फेसबुकवर सना कुरेशी नावाच्या तरुणीसोबत ओळख झाली. सुरूवातीला दोघांमध्ये मैत्री झाली. फेसबुकवर दोघांमध्ये दररोज गप्पा होऊ लागल्या आणि त्यांच्यात जवळीक वाढली. नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर दोघांमध्ये शारीर संबंध देखील झाले. मात्र या शारीर संबंधाचे व्हिडिओ सना कुरेशीचा मित्र राहुल परवानीने आपल्या मोबाईलमध्ये शूट केले. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत सना कुरेशी आणि राहुल परवानी यांनी गेल्या १८ महिन्यात राज मोरे यांच्याकडून तब्बल ३ कोटी रुपये उकळले.

राज मोरे यांच्याकडे आरोपी सतत पैशांची मागणी करतच राहिले. त्यामुळे राज वैतागले होते त्यामुळे त्यांनी आरोपींचे फोन उचलण्यास टाळाटाळ केली. यानंतर सना कुरेशी आणि राहुल परवानी या दोघांनी राज यांच्या घरी जाऊन त्यांच्या आईसमोरच शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली. त्यावेळी दोघांनी पुन्हा एकदा त्यांना शरीरसंबंधाचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. या सततच्या मानसिक छळामुळे राज मोरे हताश झाले आणि त्यांनी विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपवले.

आत्महत्येपूर्वी राज यांनी सुसाईड नोट लिहिली होती. या सुसाईड नोटमध्ये राज मोरे यांनी त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या सना कुरेशी आणि राहुल परवानी या दोघांच्या नावाचा उल्लेख करत त्यांनी कसा छळ केला हे लिहिले. वाकोला पोलिसांनी राज मोरे यांनी लिहिलेली सुसाइड नोट जप्त केली आहे. त्यानंतर पोलिसांनी राज मोरे यांना आत्महत्येच प्रवृत्त केल्याप्रकरणी सना कुरेशी आणि राहुल परवानी या दोघांविरोधात आत्महत्या प्रवृत्त करणे, खंडणी आणि ब्लॅकमेलिंग या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali 2025: कमी बजेट… अफलातून सजावट! दिवाळीत घर सजवण्यासाठी हे सोपे उपाय वापरून बघा

पुन्हा Ind-Pak ड्रामा! रोहित-विराटकडून पाकिस्तानी चाहत्यांना स्पेशल गिफ्ट, नेमकं काय घडलं? Video

Maharashtra Live News Update: पालघरमध्ये अर्ध्या तासापासून परतीच्या पावसाची दमदार हजेरी

नाल्याच्या पुलावरून स्कूल व्हॅन उलटली अन् 10 विद्यार्थी...; नेमके काय घडले? VIDEO

Maharashtra Politics : निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; बडा नेता मशाल सोडून कमळ हाती घेणार

SCROLL FOR NEXT